मुक्ताईनगर (प्रतिनिधी) भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष मार्फत “सेवा सप्ताह” साजरा करण्यात येत आहे. त्याअंतर्गत भाजपा मुक्ताईनगर व भाजयुमो मुक्ताईनगर” तालुका यांच्यावतीने माझ्या प्रमुख उपस्थितीत व डॉ. राजेंद्र फडके, प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर यांच्या मार्गदर्शनात गोदावरी मंगल कार्यालयात भव्य रक्तदान शिबीरा चे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी खासदार रक्षाताई खडसे व डॉ.राजेंद्र फडके, अशोक कांडेलकर यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिबिरास सुरवात करण्यात आली. यावेळी परिसरातील अनेक नागरिक, भाजपा व भाजयुमो पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येन रक्तदान केले व प्रधानमंत्री यांना याद्वारे शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, जिल्हा उपाध्यक्ष डी.एस.चव्हाण, संतोष खोरखेडे, विधानसभा क्षेत्रप्रमुख ललित महाजन, ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष रहस्य महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष प्रफुल जवरे, भाजपा तालुका सरचिटणीस चंद्रकांत भोलाणे, विनोद पाटील, राहुल राणे, भाजपा शहराध्यक्ष पंकज कोळी, भाजयुमो तालुकाध्यक्ष अंकुश चौधरी, माजी नगराध्यक्षा नजमा तडवी, भाजयुमो विधानसभा क्षेत्र प्रमुख दत्ता पाटील, अतुल महाजन, महेश खेवलकर, मयूर महाजन, उमेश भिंगरे, कैलास वंजारी, विजय काठोके, वैद्यकीय आघाडी अध्यक्ष विक्रांत जयस्वाल, अंबादास बेलदार, निवृत्ती भाऊ, रामेश्वर ढोले, निखिल भोलानकर, शुभम काळे, जयेश कारले, आकाश कोळी यांच्यासह भाजपा, भाजयुमो पदाधिकारी व कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.