चोपडा (प्रतिनिधी) जैन धर्मीय तीर्थस्थळ सम्मेद शिखरजी व गिरिडीह पर्वतास झारखंड सरकारने व केंद्र सरकारने पर्यटन स्थळ बनवण्याचे निर्णय रद्द करावे व तिर्थस्थळाचे पावित्र्य अबाधित राहावे, या मागणीसाठी चोपडा तालुक्याचे सकल जैन समाजाच्या वतीने आज 21 डिसेंबर भव्य मूक मोर्चा रोजी काढण्यात आला.
मूक मोर्चा गोल मंदिर जवळील श्री संत निवास पासून चावडी शनी मंदिर जैन मंदिर पाठक गल्ली गांधी चौक राणी लक्ष्मीबाई चौक असा मार्गक्रमण करत तहसील कचेरीवर येऊन धडकला समारोप स्थळी तहसीलदार अनिल गावित यांना निवेदन देण्यात आले असता समाजाच्या भावना केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
तदनंतर साध्वीश्री मार्गदर्शिताश्रीजी म सा यांनी सम्मेद शिखरजी हे तीर्थस्थल अनादी काळापासून असून जैनांचे 24 तीर्थंकर पैकी वीस तीर्थंकरांना मोक्षप्राप्ती या स्थळावरून झाली असून संपूर्ण पर्वताराजित हजारो मंदिरे स्थित आहेत जैन समुदायाचे साधू संत व श्रावक आत्म साधनेसाठी व मोक्षप्राप्ती व्हावी या उद्देशाने तपस्या करण्यासाठी व दर्शनासाठी जाऊन कृतार्थ होतात अशा तीर्थस्थळास पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केले तर अराजकता वाढेल, मास विक्री,मदिरा विक्री ची सुरुवात होईल व जैन धर्माचे मूळ सिद्धांत नष्ट होईल म्हणून सरकारने सदरील निर्णय त्वरित मागे घेऊन जैन धर्मियास न्याय मिळवून द्यावा अशी विनंती केली
प्रा शांतिलाल बोथरा यानी छोटेखानी भाषणात सांगितले की अहिंसाच्या संदेश देणाऱ्या तीर्थंकराची भूमी असे नावलौकिक असलेल्या सम्मेद शिखरजी तीर्थ पर्यटन स्थळ घोषित करणे हे अत्यंत चुकीचे असून त्यामुळे पावित्र्य नष्ट होईल व पर्यायाने जैन धर्मियांच्या भावना दुखावल्या जातील म्हणून शासनाने सदरील निर्णय त्वरित रद्द करावा अशी मागणी केली.
श्री वर्धमान ओसवाल जैन श्री संघ, श्री तारण तरण जैन समाज, श्री दिगंबर जैन समाज, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्री संघ, श्री क द ओ मूर्ति पूजक जैन श्वेतांबर श्री संघ, श्री दादावाड़ी ट्रस्ट, भारतीय जैन संघटना, जैन नवयुवक मंडळ, सकल जैन महिला मंडळ, सुशील बहू मंडळ, जिन कुशल महिला मंडळ, तारण तरण युवा परिषद, आदिनाथ दिगंबर जैन नवयुवक मंडळ चे पदाधिकारी सर्वश्री प्रा शांतिलाल बोथरा, गुलाबचंद देसर्डा, एड रविंद्र आर जैन ,संजय गोकुलदास श्रावगी, विनोद बी टाटिया एड सुधीर एफ जैन, सुभाषचंद बरडीया, कैलास जैन , रसिकलाल जैन नेमीचंद कोचर सुनील बुरड़ संजय मोहनलाल श्रावगी, प्रकाशचंद केशरलाल जैन दीपक राखेचा, महिंद्र मोतीलाल जैन, पारस जैन, सुनील बरडीया, अजय जैन राजेंद्र रमनलाल जैन, शैलेश चंपालाल जैन , महावीर टाटिया, मानकलाल चोपड़ा, तिलकचंद शाह, निर्मल बोरा दिनेश लोडाया , सुधीर चंदूलाल जैन, एड अशोक व्ही जैन, डॉक्टर आर टी जैन , विशाल जैन, महिंद्र होशिलाल जैन, लतीश जैन व इतर सदस्य उपस्थित होते.
मोर्चा यशस्वीतेसाठी दर्शन देशलहरा, मयंक बरडिया, जितेंद्र बोथरा, सनम जैन, अल्केश जैन, रोहन राखेचा, श्रेणीक रूनवाल, सौरभ जैन कीर्ती कुमार जैन , मनोज जैन, प्रशांत जैन ,पवन जैन ,डॉ भूषण जैन ,राकेश जैन ,विजय जैन, गौरव कोचर, अभय ब्रह्मेचा, व युवक मंडळांनी सहकार्य केले. सदरील मोर्चास व मागणीस व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष अमृतराज सचदेव व पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शवला चोपडा शहर पोलीस प्रशासनाने बंदोबस्तासाठी सहकार्य केले.