धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील मोठा माळी वाडा ते पिंपळेरोडवर एका ठिकाणी काही मेंढपाळ थांबलेले आहेत. रात्रीतून तब्बल १०० हून अधिक मेल्याचे आज सकाळी उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे.
या संदर्भात अधिक असे की, शहरातील मोठा माळी वाडा ते पिंपळेरोडवर एका ठिकाणी दिलीप मधुकर वाघ (माळी) यांच्या शेतात धुळे जिल्ह्यातील मेंढपाळ वाडा उतरला होता. मंगळवार सायंकाळी मेंढपाळ मेंढ्याच्या कळपातील ५ ते ६ मेंढ्या अचानक दगावल्या. त्यानंतर रात्रीतून तब्बल १०० हून अधिक मेल्याचे आज सकाळी उघडकीस आल्यानंतर मात्र, खळबळ उडाली. पाणी किंवा चाऱ्यातून मेंढ्यांना विषबाधा झाल्याची शंका आहे. या घटनेत १००ते १२५ मेंढ्या दगावल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच जि.प.सदस्य प्रतापराव पाटील यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देत मेंढपाळ बांधवांचे सांत्वन केले.
यावेळी कृषी अधिकारी श्री. देसले, निवासी नायब तहसीलदार श्री.सातपुते, जिल्हा परिषदचे डॉक्टर महाजन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रमोद पाटील, पिंपळे गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, धरणगाव शहरातील शिवसेना पक्षाचे पदाधिकारी बाळू जाधव, रवी महाजन, राजू सुकलाल महाजन, हेमंतभाऊ चौधरी उपस्थित होते. दरम्यान, १०० हून अधिक मेंढ्या मेल्याचे मेंढपाळ यांचे मोठे नुकसान झाले आहे.