जळगाव (प्रतिनिधी) दुधात गोळ्या टाकून झोपेतच शहरातील घर काम करणाऱ्या एका विवाहीतेवरलैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस स्थानकात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरालगतच्या एका उपनगरातील ३० वर्षीय विवाहितेची पाचोरा तालुक्यातील जयदीप पाटील (वय ३०) नावाच्या तरुणासोबत ओळख होती. त्याने गरम दुधात गोळ्या टाकून ते दूध तिला पिण्यास दिले. पिडीतेला गुंगी आल्यानंतर त्याने तिच्यासोबत झोपेतच शरीर संबंध प्रस्थापीत केले. ज्यावेळी हा प्रकार पिडीतेच्या लक्षात आला त्यावेळी तिने त्याला जाब विचारला. पण तू जर हा प्रकार तुझ्या पतीला सांगितला तर तुझा, तुझ्या मुलाचा आणि तुझ्या पतीचा मर्डर करेन, अशी त्याने पिडीतेला धमकी दिली. एवढेच नव्हे तर जयदीप हा पिडीतेसोबत वेळोवेळी लैंगिक अत्याचारसह मारठोकही करत राहिला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रोहीदास गभाले करत आहेत.