मुंबई (वृत्तसंस्था) नाशिकचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेला धक्का देत पुन्हा भाजपचा हात धरला. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सानप यांनी मुंबईत भाजपप्रवेश केला. ‘भाजपमध्ये काम करताना अनेकजण जोडले गेले. पक्ष मोठा करण्यासाठी खूप काम केले. मधल्या काळात थोडासा दुरावा आला, पण संघ आणि भाजपचे काम केलेला माणूस दुसरीकडे रमू शकत नाही म्हणून पुन्हा भाजपात प्रवेश करत आहे, अशा भावना बाळासाहेब सानप यांनी व्यक्त केल्या.
नाशिकचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेला धक्का देत भाजपमध्ये घरवापसी केली आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सानप यांचे पक्षात स्वागत केले. ‘बाळासाहेब सानप भाजप पुन्हा प्रवेश करतात याचा आनंद आहे. समज-गैरसमज तयार झाले आणि त्यातून अंतर निर्माण झाले, पण मनाने ते आमच्यामध्ये होते. भाजप माझा पक्ष आणि माझे जीवन इथेच घालवायचा आहे, असं बाळासाहेब सानप यांनी मला सांगितले. त्यासाठी कुठलेही निगोसिएशन करावे लागले नाही. बाळासाहेब परत आल्यामुळे भाजपमध्ये नवचैतन्य येईल. जुन्या-नव्या कार्यकर्त्यांमध्ये कुठलीही अडचण येणार नाही,” असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला. ‘विचार आणि ध्येयाने काम करणारी माणसे फार काळ एकमेकांपासून दूर राहू शकत नाहीत. त्यामुळे ते भाजपात आले आहेत, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली. तसेच, सानप यांच्या क्षमता आहे, त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत त्यांना मोठी जबाबदारी देण्यात येणार येईल, अशी घोषणाही चंद्रकांत पाटलांनी यावेळी केली.
एका विचार आणि ध्येयाने झपाटलेली माणसं फार काळ दूर राहू शकत नाहीत. एका घटनेमुळे बाळासाहेब सानप दूर गेले. पण त्यांच्या मनात अस्वस्थता होती. पुन्हा इथेच जायचं आहे, हे त्यांना माहिती होतं. पण आता गैरसमज दूर झाले आहेत. या काळात ना कुणी पक्षाबाहेर गेलं, ना कुणाचा उत्साह कमी झाला. बाळासाहेब हे राज्याच्या पातळीवरील नेते असल्याने त्यांना चांगली जबाबदारी दोन तीन दिवसात जाहीर करेन. नाशिक महापालिकेसोबतच देवयानी फरांदे, जयकुमार रावल, गिरीश महाजन यांच्या साथीने सानप यांनी उत्तर महाराष्ट्राचं राजकारण करावं, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला.