यावल (2 डिसेंबर 2024) : : यावल तालुक्यातील हरीपुरा या गावातील माहेर असलेल्या 25 वर्षीय विवाहितेचा माहेरून ट्रॅक्टर घेण्यासाठी एक लाख रुपये आणावे याकरीता चार जणांनी छळ केला. तिने पैसे न आणल्याने तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन माहेरी सोडून दिले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात रविवारी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे छळ प्रकरण
हरिपुरा, ता.यावल येथील माहेर असलेल्या उमा गणेश सोळंके (25) या विवाहितेने यावल पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तिचे पती गणेश शांताराम सोळंके, सासू आशाबाई शांताराम सोळंके (कोळन्हावी, ता.यावल) व नणंद गायत्री गोपाळ सोनवणे व गोपाळ सोनू सोनवणे (रा.पिंप्राळा, जळगाव) या चौघांनी विवाहितेचा माहेरून ट्रॅक्टर घेण्यासाठी एक लाख रुपये आणावे यासाठी छळ केला व तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन तिला माहेरी सोडून दिले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात विवाहितेच्या फिर्यादीवरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे.