संगमनेर (वृत्तसंस्था) तालुक्यातील एका गावात विवाह सोहळ्यासाठी आपल्या परिवारासश आलेल्या ९ वर्षीय अल्पवयीन मुलीवर हळदी कार्यक्रमाच्या दिवशी नराधम तरुणाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. रमेश जयराम सांगळे (रा. सोनेवाडी, ता. संगमनेर) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून रमेश सांगळेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील एका गावात विवाह सोहळा असल्याने पीडित मुलगी कुटुंबीयांसमवेत आली होती. सोनेवाडी येथे राहणारा रमेश सांगळे हा पीडित मुलीला हळदीच्या दिवशी रात्री शेतात घेऊन गेला होता, तेथेच त्याने तिच्यासोबत अश्लील वर्तन करत तिच्यावर अत्याचार केला. बराच वेळ झाला तरी तू लवकर आली नाही, कुठे बसली होती? असे पिडीत मुलीला आईने विचारले असता रमेश सांगळे याने तिला शेतात नेले होते. तेथे त्याने काय-काय केल्याची आपबिती सांगत आपल्याला त्रास होत असल्याचे सांगितले. यांनंतर पीडित मुलीच्या आईने संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सांगळे याच्याविरोधात पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून घेत त्याला तातडीने अटक केली आहे.
















