भुसावळ (प्रतिनिधी) येत्या १२ ऑक्टोंबरपासून आयुध निर्माणी भुसावळसह देशातील ४१ आयुध निर्माणींचे जवळपास ८२ हजार कर्मचारी देशव्यापी अनिश्चित कालिन संपावर जात आहे.
आयुध निर्माणींचे निर्गमिकरण देशाच्या राष्ट्रीय सुरक्षिततेला घातक असल्याने रद्द करणे. यासाठी संरक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या एआयडिईएफ, आयएनडिडब्लुएफ व बिपीएमएस या महासंघाद्वारे संप पुकारण्यात आला आहे. संपासाठी सर्वच कायदेशीर बाबींचा विचार करून पुर्तता करण्यात आली आहे. ४५ दिवस आधी दि. ४ ऑगस्ट २०२० रोजी संपाची अधिकृत नोटिस महाप्रबंधक यांना संरक्षण मंत्रालयसाठी सोपविली व त्या पुर्वी ९९.५ % कर्मचाऱ्यांनी संपावर जाणेसाठी गुप्त मतदान करून भरगोस समर्थन दिले होते.
संप यशस्वी करण्यासाठी स्थानिक संयुक्त समिती द्वारे आवश्यक सर्व तयारी पुर्ण करण्यात आली आहे. दररोज सकाळी ७ वाजता सोशल डिस्टंसिंग चे पालन करून निर्माणी गेटवर नारेबाजी, निगमिकरण विरोधात विरोध प्रदर्शन केले जात आहे व सरकार विरोधात रोष व्यक्त केला जात आहे. सध्या कोविड-१९ ची स्थिती असल्याने कर्मचाऱ्यांनी घरी राहुन संपात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. करमचा-यांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता संपात सहभागी होण्याचे सांगितले आहे. सरकार व कर्मचारी कुठल्याही प्रकारे समेट घडविण्यासाठी चर्चा झाली नसल्याने संप अटळ असल्याचे संयुक्त संघर्ष समिति द्वारे सांगण्यात आले – संयुक्त संघर्ष समिति चे सर्व पदाधिकारी सभासद संप यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.















