डोंबिवली (वृत्तसंस्था) डोंबिवलीमधील सावळाराम क्रीडा संकुलातील कोव्हिड सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या काही कर्मचाऱ्यांची चक्क रुग्णालयात गांजा आणि दारू पार्टी करीत आहे. या संतापजनक कृत्याचा व्हिडिओ काढणाऱ्या तरुणाला पार्टी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मारहान केली आहे. त्यामुळे आता पुन्हा कोरोना रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
संबधित कोव्हिड सेंटर पालिका प्रशासनाने उभारले असले तरी, हे रुग्णालय खासगी डॉक्टरांच्या संस्थेमार्फत चालवण्यात येते. संबधित रुग्णालयात कर्मचाऱ्यांनी केलेले कृत्य अत्यंत चूकीचे आहे. असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. ठेकेदाराने पार्टी करणाऱ्या तिन्ही कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. या सारख्या घटना पुन्हा घडू नयेत. याची दक्षता घेण्याच्या सूचना संबधित ठेकेदाराला पालिकेच्या आरोग्य विभागाने दिल्या आहेत.
















