धरणगाव (प्रतिनिधी) येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ उद्या सुप्रसिद्ध शिवव्याख्याते प्रदीप देसले यांचे शिवजयंती निमित्ताने जाहीर व्याख्यान होणार आहे. छत्रपती शिव- शंभूच्या धगधगता पराक्रमी इतिहास यावर हे व्याख्यान होणार आहे.
उद्या दिनांक 22 फेब्रुवारी 2025 शनिवारी रोजी होणाऱ्या व्याख्यानाचे आयोजक चंदन पाटील (पवार पेट्रोलियम), गुलाब मराठे (युक्ता गार्डन), भीमराज पाटील (कृपा एक्वा), गोपाल पाटील (सामाजिक कार्यकर्ता), भैया मराठे (प्राची अर्थमूव्हर्स), जितू महाराज (जगदंबा टेन्ट हाऊस जगदंबा डीजे), वैभव पाटील (वेदा कन्स्ट्रक्शन), गजानन साठे (श्री स्वामी समर्थ प्रॉपर्टीज अँड डेव्हलपर्स, ॲड. संदीप पाटील (सामाजिक कार्यकर्ता), नामदेव मराठे (सामाजिक कार्यकर्ता), आकाश महाजन (नमो आदेश कंट्रक्शन), राहुल पाटील (सामाजिक कार्यकर्ता) हे आहेत. तसेच धरणगाव शिवजयंती उत्सव समितीचे सहकार्य लाभणार आहे.