जळगाव (प्रतिनिधी) : प्रवाशांची वाट पाहत उभ्या असलेल्या रिक्षा चालकासोबत वाद घालीत त्याला लाकडी धोपटण्याने मारहाण करीत गंभीर जखमी केले. ही घटना दि. ३ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता सुप्रिम कॉलनीतील सागर अपार्टमेंटजवळ घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मोहीत जयसिंग बागडे (रा. सिंधी कॉलनी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील रायपुर कुसुंबा फाट्याजवळ सचिन राजू राठोड (वय ३२) हे वास्तव्यास असून ते रिक्षा चालक आहे. दि. ३ जानेवारी रोजी दुपारच्या
सुमारास ते सुप्रिम कॉलनीतील सागर अपार्टमेंटजवळ प्रवाशांची वाट पाहत उभे होते. यावेळी संशयित मोहीत जयसिंग बागडे हा त्यांच्याजवळ येवून त्यांच्यासोबत हुज्जत घालू लागला. यावेळी त्यांच्यात बोलाचाली झाल्याने मोहीत बागडे याने त्याच्याजवळील धोपटण्याने राठोड यांना मारुन गंभीर जखमी केले. जिल्हा रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर राठोड यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार संशयित मोहीत जयसिंग बागडे (रा. सिंधी कॉलनी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोना पंकज पाटील हे करीत आहे.
















