बोदवड (प्रतिनिधी) महाराष्ट्रातून मध्ये प्रदेशात अवैध प्रकारे लाकुड वाहतूक करणारा ट्रक बोदवड येथील सामाजिक कार्यकर्ते चेतन तायडे व त्यांचे पत्रकार मित्र यांनी वनविभागाच्या ताब्यात दिला.
दि.२६रोजी रात्री नऊ साडेनऊच्या सुमारास सामाजिक कार्यकर्ते चेतन तायडे व त्यांचे पत्रकार मित्र हे दोन्ही घरी जात असताना ट्रक क्रमांक (MP.09 KC.4331) यामध्ये अवैध प्रकारे लाकुड वाहतूक होत असल्याची शंका आली. त्यामुळे त्यांनी सदर ट्रकला थांबविला. त्यानंतर ट्रक चालक यांना वाहतूक पास बद्दल विचारले असता वाहतूक पास नसल्याचे व वनविभागाची कोणत्याही प्रकारची परवानगी नसल्याचे सांगितले. यानंतर दोघांनी हि माहिती वनविभागाला दुरध्वनीद्वारे कळविली.
माहिती मिळताच वनविभागाचे वनरक्षक मनोज वंजारी व दोन वनमजूर घटनास्थळी आले. सदर ट्रकची पाहणी केली असता अवैध प्रकारे लाकुड वाहतूक होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी तो ट्रक साळशिंगी येथील प्रादेशिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोप वाटिका येथे लावला.
दि.२७ रोजी वनपाल उमाकांत कोळी,वनरक्षक रूपाली शिर्के यांनी या अवैध लाकुड वाहतूक करणाऱ्या ट्रकचा पंचनामा केला असतात त्यात अंदाजे १० घनफुट मिटर ओले निम,पंचराऊ असे आढळून आले आहे. सदर अवैध प्रकारे वृक्षतोड करून बोदवड तालुक्यातुन बऱ्हाणपूर (मध्ये प्रदेश) येथे अवैध प्रकारे वाहतूक सुरू आहे. यावर प्रतिबंधक कारवाई व गस्त पथकामार्फत तसेच नियमानुसार कारवाई करण्यात यावी याकरिता संबंधित वनपाल,वनरक्षक या अधिकारी कर्मचारी यांनी सतर्क राहण्याचे गरजेचे आहे.