जळगाव (प्रतिनिधी) शासनपति श्रमण भगवान श्री महावीर जन्म कल्याणक महोत्सवा अंतर्गत ट्रेझर हंट चा यशस्वी कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात स. ७.१५ वाजता खान्देश सेंट्रल येथे नवकार महामंत्राने झाली. जळगांव जैन युथ पॉवर यांनी या कार्यक्रमाची व्यवस्था पाहिली. या प्रतियोगितेमध्ये 16 ते 50 वर्षाच्या सुमारे 100+ युवक- युवती व महिलांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. प्रत्येक टीमला मिळालेल्या शीटमध्ये विविध कोडे समझुन त्यावरुन दिलेल्या जागी जायचे होते; जसे जैन मंदिर, जैन भवन, भाऊंचे उद्यान, गांधी गार्डन ईत्यादी. तेथे त्यांना मिळालेले टास्क करुन सरते शेवटी या वर्षीचे अंतिम स्थळ अणुव्रत भवन येथे येऊन त्यांना संसार सागरातुन मुक्तिद्वारा कडे पोहचायचे होते.
या संपूर्ण खेळाची प्लॅनिंग व संकल्पना आकाश अशोकचंदजी चोपडा यांची होती. या वर्षाची थीम ही संसार सागरातुन मुक्तिद्वाराकडे ही होती. नैराश्य, टेंशन, राग, द्वेष, क्रोध, लालच असलेल संसारातुन तरुन पूण्याद्वारे भ. महावीरांसारखे आपण ही स्वतः मनाच्या अंधकारावर विजय प्राप्त करुन जीवनाचे सर्वोच्च ध्येय गाठु शकतो (मुक्तीद्वार) हा संदेश यात कल्पकपणे प्रसारित करण्यात आला.
विशेष : भ. महावीरांच्या संदेशाचा प्रसार, तप, त्याग, मतदान जनजागृती, गौमातेची सेवा, मंदिरांत जाऊन दर्शन, दान-धर्म, अध्यक्षांचा व नवकारशी लाभार्थी परिवाचा सत्कार इत्यादी अनेक नवीन संकल्पना यावर्षी यशस्वीपणे पूर्ण करण्यात आल्या. तरुणांमधील उत्साह हा अभूतपूर्व होता. सहभागींद्वारे विविध थीम मध्ये गाड्या सजविण्यात आल्या होत्या. तसेच सहभागींनी जैन थीम, भगवान महावीरांचे संदेश, अहिंसा थीम, कश्मिरी थीम, अश्या कल्पक पध्दतीने वेशभुषा स्पर्धेत भाग घेतला.
सकल जैन श्री संघाचे अध्यक्ष दलुभाऊ जैन यांनी या कार्यक्रमासाठी विशेष आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या. यावेळी समिती अध्यक्ष पारसजी रांका, स्वरुपजी लुंकड, रिकेश गांधी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या ट्रेझर हंट साठी आकाश चोपडा (अध्यक्ष: जळगांव जैन युथ पॉवर) व कमिटी सदस्य : प्रक्षाल मुथा, समिक्षा रेदासनी, हार्दिक पारख, गितांजली पारख यांनी अथक प्रयत्न केले.* अणुव्रत भवन येथे कार्यक्रमाची सांगता झाली.