धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंप्री येथे थांबलेल्या कारला समोरून येणाऱ्या एका ट्रकने धडक दिल्यामुळे भुसावळकडून मुंबई येथे जाणाऱ्या एकाच परिवारातील तब्बल ८ जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी धरणगाव पोलिसात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निर्मला करुणेश गुप्ता (वय ५६ वर्ष, रा.प्लॉटनं ६ संभाजी नगर, वरणगाव रोड भुसावळ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, दि.१३ जुलै रोजी ते व त्यांचे नातेवाईक हे त्याची कार (क्र. Mh १९ dv ०८०९) हिच्याने भुसावळ ते मिरा रोड (मुंबई)) येथे जात होते. दुपारी ४ ते ४:३० च्या दरम्यान, पिंप्री ता. धरणगाव येथे त्यांची गाडी रोडच्या साईडला उभी होती. तेव्हा समोरुन येणारा ट्रकचा नंबर (एम. एच ०४ cy ९८२४) वरील चालक याने ट्रक हा रस्त्याचा परिस्थिती कडेस दुर्लक्ष करुन कारला समोरून ड्रायव्हर साईडला जोरात धडक दिली.
या अपघातात कारमधील निर्मला गुप्ता. निखिलेश गुप्ता, रक्षा निखिलेश गुप्ता, अनिता शकरलाल गुप्ता, शालीनी मंगेश गुप्ता, मंगेश गुप्ता, अंशीका गुप्ता, तरुण शंकरलाल गुप्ता अशांच्या डोक्यास, हातापायाला, तोडाला मार तसेच मुका मार लागून जखमी झाले आहेत. या प्रकरणी ट्रक चालक (नाव-गाव माहित नाहीत) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ मोती पवार हे करीत आहेत.