जळगाव, दि. प्रतिनिधी — धकाधकीच्या दैनंदिन जीवनातून थोडा विराम घेण्यासाठी जळगावात ‘अनप्लग फ्रायडे’ हा अनोखा आणि अनुभवसमृद्ध कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. येत्या शुक्रवार, 23 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून मेहरूण तलाव परिसरातील जैन ड्रीम स्पेसेस येथील अॅम्फी थिएटरमध्ये हा उपक्रम पार पडणार आहे.
नाशिकस्थित ‘अफ्रोशेल ड्रम सर्कल’ आणि ‘माइंडफुलनेस बँड’ यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या दोन्ही संस्थांनी एकत्रितपणे देशभरात आतापर्यंत ५०० हून अधिक ड्रम सर्कल्स, माइंडफुलनेस आणि ध्वनीअनुभव सत्रांचे आयोजन केले असून, हजारो सहभागी या उपक्रमांचा लाभ घेऊन गेले आहेत. तालवाद्यांचा समन्वय, सामूहिक सहभाग आणि मार्गदर्शित ध्यानधारणा यांच्या माध्यमातून मानसिक शांतता, ताणतणावमुक्ती आणि सकारात्मक ऊर्जेचा अनुभव देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
कार्यक्रमासाठी शुल्क रचना पुढीलप्रमाणे ठेवण्यात आली आहे —
अर्ली बर्ड नोंदणी (12 जानेवारीपर्यंत): 1700 रुपये,
सामान्य प्रवेश शुल्क: 1950 रुपये,
तर 5 जणांच्या गट नोंदणीसाठी प्रत्येकी 1850 रुपये असे शुल्क आकारण्यात येणार आहे.
सर्व सहभागींसाठी रुचकर भोजनाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन अंबिका जैन, सनम जगवानी, जयंतीका काबरा यांनी केले आहे .
नोंदणीसाठी संपर्क
9552922333, 9829155572 किंवा 9850087002
















