TheClearNews.Com
Wednesday, July 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पिक पेरणी करताना शेतमजूर तरुण पडले विहिरीत ; दोघांचा जागीच मृत्यू !

मृतकापैकी एकाचे महिन्यापूर्वीच जुळले होते लग्न ; येणाऱ्या दिवाळीत होणार होता विवाह !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 27, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

भंडारा (वृत्तसंस्था) शेतात पिक पेरणी करत असतांना विहिरीत एक कासव दिसल्यानंतर त्याला पकडण्याच्या मोहात विहिरीत उतरलेल्या दोन तरुण शेत मजूरांचा गुदमरल्यामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना लाखनी तालुक्यातील पेंढरी गावालगतच्या मोगरा – शिवनी शेतशिवारात बुधवारी घडली. दयाराम सोनिराम भोंडे (३५) आणि मंगेश जयगोपाल गोंधळे (२६, दोन्ही रा. मेंढा / भूगाव, ता. लाखनी) अशी मृतकांची नावे आहेत. मृतकापैकी मंगेशचे एक महिन्यापूर्वीच लग्न जुळले होते आणि दिवाळीत लग्न उरकणार होता.

पिक पेरणी करण्यासाठी मेंढा येथील मजूर गढपेंढरी येथील शेतकरी विष्णुदास गायधने यांच्या शेतात आले होते. घटनेच्या दिवशी सकाळी आलेले मजूर वेगवेगळ्या धुऱ्याने शेतातील धुऱ्यात उतरत होते. त्यापैकी मृतक हे बांधीत उतरत असलेल्या धुऱ्यालगत असलेल्या एका विहिरीजवळून पेरणी करत असतांना त्यांना विहिरीत एक कासव दिसले. कासवाच्या मोहात दोघं जण एकामागून एक दोघं विहिरीत उतरले. आधी उतरलेला बेशद्ध झाल्याने दुसराही तरुण विहिरीत उतरला. या दोघांनाही पुन्हा वर येताच आले नाही.  हे कळताच तिसरा मजूर किशोर हजारे याने सहकाऱ्यांना मदतीसाठी आरडओरडा केला. विहिरीत अडकलेल्यांना वाचविण्यासाठी सुधीर हजारे हा विहिरीच्या ५ ते ६ पायऱ्या खाली उतरला. परंतु, त्यांचा श्वास गुदमरल्याने इतर मजुरांनी साडीच्या साहाय्याने त्याला वर खेचले. त्यामुळे तो सुखरूप बाहेर आला.

READ ALSO

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

अंगणात झोपलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

घटनेची माहिती लाखनी पोलीस ठाण्यात देण्यात आली. यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीबाहेर काढून उत्तरीय परीक्षणासाठी ग्रामीण रुग्णालय, लाखनी येथे पाठविले. याप्रकरणी लाखनी पोलिसांत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दयाराम भोंडे व मंगेश गोंधळे यांच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतक मंगेशचे काही महिन्यांपूर्वी लग्न जुळले होते. येणाऱ्या दिवाळीत त्याचा विवाह होणार होता. दरम्यान, काही ग्रामस्थांच्या मते, हे मजूर पाणी काढण्यासाठी आत उतरले होते, तर काहींच्या मते कासव पकडण्यासाठी उतरले होते. तर काहींच्या मते पेरणी करत असतांना तोल जाऊन पडल्याने दोघांचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला. पोलीस तपासात नेमकं कारण समोर येणार आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

July 29, 2026
गुन्हे

अंगणात झोपलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

July 29, 2026
गुन्हे

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

July 27, 2026
गुन्हे

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीची निघृण हत्या

July 27, 2026
गुन्हे

चाळीसगावात बंद घर फोडून अडीच लाखांचा ऐवज लंपास

July 26, 2026
गुन्हे

धरणगावजवळ तीन वाहनांचा भीषण अपघात; दोन चालक गंभीर

July 26, 2026
Next Post

पेपर देण्यासाठी निघाला, एसटीला मागून धडक अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेतकऱ्यांना एक लाख कृषी पंप वीज जोडण्यांसाठी नवीन धोरण जाहीर

November 20, 2020

गिरीश महाजन म्हणतात, उत्तरप्रदेश तो झाँकी है, महाराष्ट्र अभी बाकी है !

March 10, 2022

बहुमत चाचणीत महाविकास आघाडीला दणका, शिंदे- भाजपा गटाचा दणदणीत विजय

July 4, 2022

इदगाहमध्ये वृक्षारोपण, १०० झाडे जगवणार : फारूक शेख

May 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group