मुंबई (वृत्तसंस्था) इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. यात बायको चालू गाडीवर मुलासमोर नवऱ्याचे लाड पुरवीत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी प्रचंड भडकले आहेत.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ कोणत्या शहरातील आहे याची अधिकृत माहिती समोर आली नाही. परंतू तरुण गाडी चालवत आहे, तर त्याची बायको मागे बसली असून चिमुकला पुढे बसलाय. तरुणाची बायको हातात सिगारेट घेऊन बसल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, ही सिगारेट ती स्वतः ओढत नाही, तर समोर गाडी चालवणाऱ्या पतीला ओढायला देते. अगदी महिला मध्येमध्ये सिगारेट नवऱ्याच्या तोंडाला लावताना दिसत आहे. नवराही गाडी चालवता चालवता अधून मधून सिगारेट ओढतोय. यावेळी पाठीमागून कारमध्ये येणाऱ्या व्यक्तीने त्यांचा व्हिडिओ शूट केला.
या व्हायरल व्हिडिओमध्ये पतीने हेल्मेट घातलेले दिसत नाही. तसेच, सिगारेट ओढण्यासाठी तो पाठीमागे बघतो. यावेळी गाडीवर त्यांचा चिमुकला मुलगा बसलेला असताना हा सर्व प्रकार सुरू आहे. गाडी चालवणाऱ्या तरुणाला सिगारेटची झालेली तलफ त्याची पत्नी पुर्ण करते. हा धक्कादायक प्रकार पाहून नेटकऱ्यांनी या दोघांना चांगलेच फैलावर घेतले आहे. दरम्यान, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच शेअर केला जात असून अनेकांनी त्यावर आपल्या मजेशीर कमेंट केल्या आहेत. त्याचबरोबर पुढे लहान लेकरू असतानाही रस्त्यावरून जात असताना सदर व्यक्तीने सिगारेट ओढल्यामुळे काही नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर संताप व्यक्त केला आहे. दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील adult.company या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले आहेत.