पारोळा (प्रतिनिधी) शहरातील भिलाटी दरवाजा येथील एका २० वर्षे तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील भिलाटी दरवाजा परिसरातील रहिवासी विशाल संजय अवचिते (वय २०) या तरुणाने सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरात असलेल्या लोखंडी अँगलला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस अाली. हे वृत्त कळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत त्या तरुणाला खाली उतरवून कुटीर रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करुन विशाल अवचिते याला मृत घोषित केले. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी विशाल अवचिते यांच्या वडिलांचेही निधन झाले अाहे. त्यामुळे तो घरात एकटाच राहत होता. या नैराश्यामुळेच त्याने आत्महत्या केल्याचे समजते. याबाबत प्रकाश अवचिते यांच्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
















