बोदवड (प्रतिनिधी) शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौका जवळील रस्तेलगतच्या दिलीप अग्रवाल विहिरीत निलेश सुभाष माळी (वय ३५) याने रात्री आठ ते साडेआठच्या दरम्यान उडी घेऊन आत्महत्या केली.
सुमारे एका वर्षा आधी मयत निलेश सुभाष माळीची पत्नी हिने घरामध्ये मुलबाळ होत नाही. या कारणाने तिने घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेमुळे सदर निलेश माळी यांच्यावर सासर कडील मंडळींनी मृत्यूस कारणीभुत धरून सदर मयत निलेश माळी यांच्यावर बोदवड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला होता. त्यानंतर निलेश माळी हे जामिनावर बाहेर होते. पत्नीची आत्महत्या व त्यास कारणीभूत ठरल्याचे ठपका ठेऊन दाखल झालेला गुन्हा, यामुळे निलेश मानसिक नैराश्याने ग्रासला होता, त्याचे निकटवर्तीयांनी सांगितले. या बाबत बोदवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून पुढील तपास हे कॉ रवींद्र गुरचळ हे करत आहेत.