जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावामधील १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यासह त्याचा जाब विचारणाऱ्या आईचाही तरुणाने विनयभंग केला. ही घटना दि २७ जुलै रोजी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात भूषण सोपान पाटील (रा. शिरसोली प्र.न., ता. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आले.
तालुक्यातील एका गावातील १२ वर्षीय अल्पवयीन कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. त्या मुलीला तिचे वडील शाळेत सोडायला जात असताना भूषण पाटील याने मुलीकडे पाहून अश्लिल हावभाव केले. या विषयी मुलीच्या आई-वडिलांनी जाब विचारला असता त्यांनाही शिवीगाळ करीत महिलेचा विनयभंग केला. या प्रकरणी मुलीच्या आईने एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार संशयित भूषण पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आले. पुढील तपास पोहेकॉ किरण चौधरी करीत आहेत.