जळगाव (प्रतिनिधी) आपल्या सहकारी मित्रांच्या आग्रहाखातर पार्टीला गेला आणि हॉटेलमधून बाहेर पडताच एका तरुणाला ट्रकने चिरडल्याची दुर्दैवी घटना आज रात्री ८ वाजेच्या सुमारास बांभोरी पुलाजवळील हॉटेल गिरणाई समोर घडली. अक्षय भेंडे (वय ३२ रा. वर्धा, ह.मु. रामानंद, जळगाव), असे मयत तरुणाचे नाव आहे.
या संदर्भात मयताच्या मित्रांनी दिलेली माहिती अशी की, ३१ मार्चचे टार्गेट पूर्ण झाल्यानंतर शहरातील एका फायनान्स कंपनीत कामाला असणारे १०-१२ मित्रांचा एक ग्रुपने बांभोरी पुलाजवळ हॉटेल गिरणाईमध्ये पार्टी करण्याचे ठरवले होते. यावेळी अक्षय भेंडे याने सुरुवातीला पार्टीला येण्यास नकार दिला होता. परंतू नंतर एका मित्राच्या आग्रहाखातर तो पार्टीला सर्वात उशिरा पोहचला. जेवण आटोपल्यानंतर हॉटेलमधून आपली दुचाकी क्र. (एम.एच.३२ आर.४०७२) बाहेर पडले. हाय-वेवर लागत असतांना १२ चाकी ट्रक क्र. (एम.एच.४९ ए.टी.४४०७) हा बांभोरीकडून येत होता. अक्षय आणि त्याच्या मित्राला देखील जळगाव शहरातच जायचे होते. परंतू रोडवर गाडी घेत असतानाच ट्रकच्या धडकेत थेट चाकाखाली आला. त्यामुळे अक्षयचा जागीच मृत्यू झाला.
अपघात एवढा भयंकर होता की, मृतदेहाचा छातीवरील भागचा अक्षरश: चेंदामेंदा झालेला होता. अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलीस स्थानकातील कर्मचाऱ्यांनी मृतदेहला जिल्हा रुग्णालयात हलवला. आणि वाहतूक सुरळीत करत ट्रक चालकाला ताब्यात घेतले. दरम्यान, मयत अक्षयच्या मित्रांचा आक्रोश मन हेलावून सोडणारा होता. मयत अक्षयच्या पश्चात पत्नी आणि एक चार वर्षाची मुलगी आहे.