जळगाव (प्रतिनिधी) शहरातील प्रभाग क्रमांक १६ मधील देवीदास कॉलनी व लाठी शाळेच्या परिसरात अमृत योजना व भुयारी गटारी काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. दरम्यान, हे काम अमृत योजनेच्या अधिकाऱ्यांनी अर्धवट सोडून दिल्यामुळे नागरिकांनी चांगलाच संताप व्यक्त करत अमृत योजनेच्या अधिकाऱ्यांची चक्क आरती ओवळली.
जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक १६ मधील देवीदास कॉलनी व लाठी शाळाजवळील परिसरात अमृत योजना व भुयारी गटारी काम अमृत योजनेच्या अधिकाऱ्यांनी अर्धवट सोडून दिले आहे. त्यामुळे खराब रस्ते, खड्डे व धुळीमुळे नागरीकांचे प्रचंड हाल होत आहे. त्यासंदर्भात नागरिकांनी आज नगरसेवक मनोज अहूजा, प्रकाश बालानी, नगरसेविका पती कुंदन काळे, तसेच अमृत योजनेच्या अधिकाऱ्यांना समस्या मांडण्यासाठी आज शनिवारी सकाळी साडेदहा वाजता बोलावले. यावेळी नगसेवक आणि अधिकारी आल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त करत अमृत योजनेच्या अधिकाऱ्यांची खराब रस्ते, खड्डे व खराब काम केल्यासाठी अक्षरशा आरती उतरविली.