नवी दिल्ली (वृत्तसंस्था) रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या अटकेचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निषेध नोंदवला आहे. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी सत्तेचा गैरवापर केला आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.
अमित शहा म्हणाले कि, रिपब्लिक टीव्ही अर्णव गोस्वामी यांच्याविरूद्ध राज्याने सत्तेचा गैरवापर करणे हा वैयक्तिक स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला आहे. ही स्थिती आणीबाणीची आठवण करून देते. स्वतंत्र प्रेसवरील या हल्ल्याचा विरोध केला जाईल, असे ट्विट त्यांनी केले आहे.
दरम्यान, रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केली आहे. वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्याआधी अन्वय नाईक यांनी सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांचे नाव होते. तर पोलिसांनी घरात जबरदस्ती घुसखोरी करत अर्णब गोस्वामी यांच्यासोबत धक्काबुक्की केल्याचा दावा रिपब्लिकने केला आहे.