अमळनेर (प्रतिनिधी) विवाहितेला लग्नाचे आमिष देऊन तिचा गर्भपातही केला अन् तिच्याच विवाहित बहिणीशी लग्न केले. ही धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी अत्याचार करणाऱ्या संशयितांविरुद्ध अत्याचारासह अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील एका भागात वास्तव्यास असलेल्या महिलेने जळगाव येथील एकाशी प्रेमसंबंधातून लग्न केले होते. परंतु, त्याच्याशी भांडण होत असल्याने तिने त्याच्याकडून घटस्फोट घेतला आहे. त्यानंतर ती अधून- मधून अमळनेर येथील तिच्या मोठ्या बहिणीकडे येत असे. ती ज्या घरात राहत होती, तेथील एकाशी तिचे प्रेम संबंध जमले. त्यानंतर ते एकमेकांना भेटत होते. त्यानंतर त्या व्यक्तीने त्या पीडित महिलेला नोकरी लावून देईल व लग्न करेल, असे आश्वासन दिले होते. तसेच आई आजारी असल्याचे सांगून या पीडित महिलेकडून एक लाख रुपये मदत म्हणून ही मागितले होते. दरम्यान, पीडितेने त्या व्यक्तीकडे एक लाख रुपये परत मागितले. परंतु, त्याने ते परत केले नाहीत.
याचदरम्यान, ही पीडिता गर्भवती होती. हे पीडित महिलेने त्या व्यक्तीला सांगितले असता त्याने तिला गर्भपात करायला सांगितले. तर गर्भपात केल्यानंतरही तो पीडित महिलेला लग्न करण्याचे आश्वासन देत राहिला. मात्र, याच दरम्यान, त्या व्यक्तीने पीडित महिलेच्या मोठ्या बहिणीशीच लग्न करून घेतले. यानंतर पीडिता त्याला जाब विचारायला गेली, तशीच तिने दिलेल्या पैशांची मागणी केली असता त्याने दोन महिन्यात पैसे देतो, असे सांगितले होते. मात्र, आजपर्यंत त्याने पीडितेला पैसे दिले नाहीत.
याच कारणावरुन त्याने पीडितेला जातीवाचक शिवीगाळ केली होती. तर १४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता त्या व्यक्तीने पीडित महिलेला घरातून हाकलून ही दिले. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून अमळनेरच्या ‘त्या’ व्यक्तीविरुद्ध अमळनेर पोलिस ठाण्यात अत्याचार व अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास अमळनेरचे प्रभारी व चोपड्याचे डीवायएसपी आण्णासाहेब घोलप करत आहेत.