भडगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील भोरटेक बुll तलाठी कार्यालयात आज सुटीच्या दिवशीही सातबारा उतार्यावर वारसांची नावे लावून सातबारा उतारा देण्यासाठी पंधराशे रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या तलाठ्यासह कोतवालाला एसीबीने रंगेहात अटक केली आहे. सलीम अकबर तडवी (वय-४४ वर्ष, तलाठी, सजा निंभोरा व प्रभारी चार्ज मौजे भोरटेक बु ll, तलाठी कार्यालय ता.भडगाव), कविता नंदु सोनवणे (वय-२७ वर्ष, महिला कोतवाल, मौजे भोरटेक बुll तलाठी कार्यालय ता.भडगाव, रा.तांदलवाडी, ता.भडगाव), असे संशयित आरोपींचे नाव आहेत. या कारवाईमुळे महसूल विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील भोरटेक बुll तलाठी तलाठी कार्यालयात स्वीकारणार्या तलाठ्यासह कोतवालाला जळगाव एसीबीने शुक्रवारी दुपारी अडीच वाजता रंगेहाथ अटक केली. ही कारवाई भडगाव तालुक्यातील भोरटेक बुll तलाठी कार्यालयात करण्यात आली. तलाठी सलीम तडवी व कोतवाल कविता सोनवणे या दोघांना एसीबीने ताब्यात घेतले आहेत. जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वात ईश्वर धनगर, राकेश दुसाने यांनी हा सापळा यशस्वी केला. दोन्ही संशयित आरोपीतांविरुद्ध भडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.