धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील जळगाव रोडवरील श्रीजी जिनींग समोर एका दुचाकीने रस्त्याच्या विरुध्द साईटला चालत दुसऱ्या मोटार सायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात तालुक्यातील सतखेडा येथील दोन जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी चोपडा येथील एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात गजानन धनसिंग पाटील यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटलेय की, ते दि. ८ रोजी त्यांची मो.सा.क्रं. (MH- १९ DJ २७०१) ने धरणगावहून सतखेडा येथे जात होते. संध्याकाळी ७.३० वाजेच्या सुमारास कल्याणे फाटा जवळील श्रीजी जिनींग समोर मो.सा.क्रं. (MH-१९ DT-८८६०) यावरील चालक वैभव गौतम गवळी (रा. चोपडा) याने त्याच्या ताब्यातील मोटार सायकल ही रस्त्याच्या विरुध्द साईटला चालवून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन हयगयीने वाहन चालवून गजानन पाटील यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात गजानन पाटील यांच्या उजव्या पायास फैक्चर केले. तसेच त्यांचे मित्र दिलीप प्रल्हाद पाटील यांचा उजवा पाय फैक्चर झाला. तसेच हातस पायास व डोक्यास दुखापती झाली. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. चंदुलाल सोनवणे हे करीत आहेत.