अमळनेर : प्रतिनिधी
चोपडाहुन नाशिककडे जाणाऱ्या बसला दुचाकीस्वारने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील तरुण जागीच ठार झाल्याची घटना १५ ऑगस्ट रोजी दुपारी घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोपड्याहून नाशिककडे निघालेल्या बस क्र.MH-40 , Y-5977 सावखेडा चौफुली पासून काही अंतरावर १५ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास पातोंडा रोडवर समोरून येणाऱ्या बसला चोपड्याकडे जात असलेला तरुण मनोज पाटील हा जागीच ठार झाला आहे. पारोळा तालुक्यातील टोळी येथील रहिवासी मनोज युवराज पाटील हा तरुण मोटारसायकलने चोपडाच्या दिशेने जात होता. तरुण जागीच ठार झाला. अपघात इतका भीषण होता की मोटारसायकल शंभर मीटरपर्यंत फरफटत जाऊन तीचे पार्ट वेगवेगळ्या ठिकाणी पडून मोटारसायकल क्षणार्धात जळून खाक झाली होती. बसमधील काही प्रवाशांच्या माहितीनुसार समोरून जलदगतीने येणाऱ्या मोटारसायकलस्वाराला वाहकाने आरडाओरडा करून वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही मोटारसायकल बसला आदळली. घटना समजताच पातोंडा येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी मयताच्या छातीवर असलेलं नाना नाव व मोबाईल क्रमांक व मोटारसायकल क्रमांकावरून मयताची ओळख पटवली होती. तेव्हा धरणगाव पोलीस कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले होते. तासाभरात अमळनेर पोलीस दाखल होऊन घटनास्थळीचा पंचनामा करून शव विच्छेदनासाठी नेण्यात आले. तसेच अमळनेर आगारातील अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मयत तरुण हा एकुकता एक असल्याचे बोललं जातं होत.