धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील लोणे-भोणे गावाजवळ आज दुपारी झालेल्या अपघातात एक जण ठार तर ४ ते ५ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. प्रवाशी वाहतूक करणारी रिक्षाने मोटार सायकलला मागून धडक दिल्यामुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
या संदर्भात अधिक असे की, आज दुपारी साधारण १२ ते १ वाजेच्या सुमारास लोणे-भोणे गावाजवळ पाटाजवळ प्रवाशी वाहतूक करणारी रिक्षाने मोटार सायकलला मागून धडक दिली. मोटार सायकरवर तीन जण प्रवास करत होते. यातील एक जण जागीच ठार झाला. तर दोघे जखमी झाले. मयताचे नाव अद्याप समजू शकलेले नाहीय. दरम्यान, मागून धडक दिल्यानंतर रिक्षादेखील रस्त्याच्या बाजूला कलंडली. त्यामुळे त्यातील ३ ते ४ जण जखमी झाले. जखमींवर धरणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथोमउपचार केल्यानंतर जळगाव रवाना करण्यात आले आहे. जखमीतील एकाची प्रकृती गंभीर असल्याचे कळते. अपघाताची माहिती मिळताच पो.नि. शंकर शेळके, पीएसआय श्री. गवारे, पो.ना. श्री. संदानशिव यांच्यासह आदी कर्मचाऱ्यांनी घटना स्थळी धाव घेतली होती.