जळगाव (प्रतिनिधी) आईला भेटण्यासाठी जात असलेली मुलगी, जावयाच्या कारला समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने धडक दिल्यामुळे पाच जण जखमी झाले. हा अपघात रविवार, १७ मार्च रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास महामार्गावर खोटेनगरच्या पुढे झाला.
एरंडोल येथील माहेर असलेल्या प्रतीक्षा सचिन पाटील (२५, रा. आयोध्यानगर) यांच्या आईची शस्त्रक्रिया झाल्याने त्यांच्या भेटीसाठी प्रतीक्षा यांच्यासह त्यांचे पती सचिन पाटील (३५), मुलगा देवांश सचिन पाटील (वय अडीच वर्षे) तसेच प्रतीक्षा यांची बहीण नंदीनी पाटील (१९), विनोद सोपान पाटील (४५) हे कारने रविवारी दुपारी एरंडोल येथे जात होते. त्यांची कार खोटे नगरच्या पुढे गेल्यानंतर समोरून येणाऱ्या चारचारी वाहनाने दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेकच्या प्रयत्नात कारला समोरून धडक दिली. त्यात कारमधील पाचही जण जखमी झाले. अपघातानंतर वाहनचालक वाहनासह पसार झाला. काही नागरिकांनी जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले.