धरणगाव(प्रतिनिधी) धरणगाव ते चोपडा रोडवर भरधाव वेगात असलेल्या खाजगी बसने एकास जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार ठार जागीच ठार झाला आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील धरणगाव ते चोपडा रोडवरील रोटवद ते साळवा फाटा रोडवर दि २४ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास बाळू पांडूरंग साळुखे (३४) हे साळवा फाट्याकडे पायी येत असतांना चोपड्याकडे जाणाऱ्या भरधाव खाजगी बस (क्र. एम.एच.४६.जे.०७६५) वरील चालक एकनाथ पंडित सैदाणे (रा.चोपडा) याने ओव्हरटेक करीत असतांना साळुखे यांना जबर धडक देत गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात संशयित आरोपी एकनाथ सैदाणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहा.फौ.सैय्यद करीम हे करीत आहेत.
















