मुंबई (वृत्तसंस्था) एका नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराहून परतत असताना झालेल्या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बिहारमधील लखीसराय या ठिकाणी झाला. या अपघातात मृत्यू झालेल्यांपैकी ५ जण हे बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे नातेवाईक आहेत.
यामध्ये सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीचे पती लालजीत सिंह यांचा देखील मृत्यू झाला आहे. ते हरियाणामध्ये एडीजी पदावर होते. यांच्यासोबत दोन बहिणी आणि इतर दोन नातेवाईकांचा समावेश आहे. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, लालजीत सिंह आपली पत्नी गीता देवी यांच्यावर अंत्यसंस्कार करून परतत होते. यात १० जणांचा समावेश होता. सहा जणांव्यतिरिक्त चार जण गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांना सिकंदरा येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. तेथून दोन जणांची गंभीर प्रकृती पाहता त्यांना पीएमसीएच (पाटणा) येथे रेफर करण्यात आले आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी सदर हॉस्पिटलमध्ये पाठवला. लखीसरायचे एसपी सुशील कुमार यांनी घटनास्थळी पोहोचून प्रकरणाची माहिती घेतली. तपासाअंती सुमोमध्ये १० जण असल्याची माहिती समोर आली आहे.
मृतांमध्ये सुशांतच्या या नातेवाईकांचा समावेश
लालजीत सिंह (बहिणीचे पती)
अमित शेखर उर्फ नेमानी सिंह
रामचंद्र सिंह
बेबी देवी
अनिता देवी
प्रीतम कुमार (चालक)