वणी (वृत्तसंस्था) वणीकडून पिंपळगावकडे जाणाऱ्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या भरधाव कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात शेतमजुरी करणाऱ्या तीन तरुणांचा मृत्यू झाला. बोराळे फाट्यानजीक शुक्रवारी (दि. ६) रात्री झालेल्या या अपघातात कारसूळ (ता. निफाड) येथील दोन सख्ख्या भावांसह अन्य एकाचा मृत्यू झाला आहे.
मंगेश रमेश हिलीम (वय २३), विजय रमेश हिलीम (वय १६) व गौरव तुकाराम पवार (वय २०) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला. शुक्रवारी रात्री ९.३० च्या सुमारास मंगेश हिलीप, विजय हिलीम व गौरव पवार हे दुचाकी (एमएच १५ बीए २२२९) वरून वणीकडून पिंपळगावच्या दिशेने जात होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या कारने (एमएच १९ एपी ९९३३) त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली.
या अपघातात तिघे गंभीर जखमी झाल्याने त्यांना वणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापुर्वीच तिघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी નૃત્યુ જ્ઞા सांगितले. याप्रकरणी शरद माधव पवार (रा. कारसूळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कारचालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर कारचालक घटनास्थळाहून फरार झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मंगेश व विजय हिलीम वणी येथील जमिर शेख यांच्या शेतात शेतमजूर म्हणून काम करीत होते. या घटनेमुळे कारसूळ परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.