जळगाव प्रतिनिधी । मराठा आरक्षण कायम ठेवण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले पाहिजेत आणि सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकललेले आरक्षण सध्याच्या काळात लागू करण्यात यावे अशी मागणी बोडवड तहसीलदारांना निवेदनाद्वारे क्षत्रिय मराठा परिवाराने केली आहे. अन्यथा महाराष्ट्रात शिवप्रेमीचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, अशा इशाराही देण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या केसच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने शिक्षण व नोकरीमध्ये तत्कालीन राज्य सरकारने दिलेल्या आरक्षणाला स्थगिती दिली आहे. यावर तात्काळ योग्य तो निर्णय घेण्यात यावा, अश्या मागणीचे निवेदन तालुक्यातील बोदवड येथील क्षत्रिय मराठा परिवार तर्फे जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आले आहे. अन्यथा महाराष्ट्रात शिवप्रेमीचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, अशा इशाराही देण्यात आला आहे. क्षत्रिय मराठा परिवार तर्फे निवेदन देण्यात येते की, सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या केसच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने शिक्षण व नौकरीमध्ये तत्कालीन राज्य सरकारने दिलेल्या आरक्षणाला स्थगिती दिली आहे. समाजासाठी हा अत्यंत निराशाजनक क्षण असून विद्यमान राज्य सरकारने आपले शर्तीचे प्रयत्न करून मराठा आरक्षण कायम राहण्यासाठी काम करावे , तसेच स्थगित केलेलं आरक्षण चालू कालावधी प्रभावा नुसार राज्यांतर्गत लागू करावं. आरक्षणासाठी शहिद झालेल्या मराठा बांधवांच्या मरणाची अवहेलना करू नये, तसेच समाजाच्या ऊद्वेगाची दखल घ्यावी, यास्तव हे निवेदन देण्यात येत असून सरकार ने तात्काळ योग्य ती पावले ऊचलावीत ही विनंती. अन्यथा महाराष्ट्रात शिवप्रेमीचा उद्रेक झाल्याशिवाय राहाणार ना याची दखल घ्यावी.
छत्रिय मराठा जिल्हाध्यक्ष रजतभाऊ शिंदे आणि जळगाव जिल्हा विद्यार्थी प्रमुख दीपक पाटील तालुकाध्यक्ष गजानन पाटील तालुका कार्याध्यक्ष शैलेश वराडे, तालुका उपाध्यक्ष गणेश पाटील, विपुल वाघ, नंदलाल पाटील, राहुल वाघ, कल्पेश वाघ, अक्षय शेळके, हर्षल पाटील, निलेश एस्कर छत्रिय मराठा परिवार यावेळी उपस्थित होते.