TheClearNews.Com
Friday, September 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा

vijay waghmare by vijay waghmare
May 3, 2026
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव ( प्रतिनिधी ) – वाणीभूषण, संस्कार भारती परमपूज्य प्रितीसुधाजी म.सा. यांचे १ मे रोजी पहाटे पुण्यात समाधीमरण झाले. त्यांचे अंत्यसंस्कार लोणीकंद येथे दुपारी करण्यात आले. आपल्या प्रभावशाली प्रवचन, संस्कारशाळा आणि विविध धार्मिक अनुष्ठानांसाठी त्या प्रसिद्ध होत्या. त्यांच्या देवलोकगमनाने महाराष्ट्राच्या संत परंपरेतील महत्त्वाचा तारा निखळल्याचे दु:ख भाविकांमध्ये आहे. त्यांचा दीक्षाकाळ हा ६५ वर्षांचा होता. त्या बाल ब्रम्हचारी होत. त्यांचे संपूर्ण जीवन संस्कार, संयम आणि साधनेचे प्रेरणा स्त्रोत होते. संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचे विचरण झाले. जळगाव ला त्या चार ते पाच वेळा आल्या होत्या. त्यांच्या वाणीने प्रभावीत होऊन अनेकांनी शाकाहार अंगिकारला. त्यांच्या मराठी भजनांना श्रद्धांळूंची पसंती असायची.

जळगाव येथील आर. सी. बाफना जैन स्वाध्याय भवन येथे श्रमण संघीय आचार्य आनंद ऋषीजी म.सा. यांच्या सुशिष्या प.पू. प्रितीसुधाजी प्रती श्रद्धाभाव अर्पण करण्यासाठी श्रमण संघिय प्रवर्तक प.पू. प्रकाश मुनीजी यांच्या आज्ञानुवर्ती प.पू. धर्मलताजी म.सा. आदी ठाणा-३ यांच्या उपस्थितीत गुणानूवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेवेळी सकल जैन श्री संघाचे अध्यक्ष दलिचंदजी जैन, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन, माजी महापौर प्रदीप रायसोनी, नयनतारा बाफना, कस्तुरचंद बाफना, विजयराज कोटेच्या, भवरलाल संघवी, राजेंद्र लुंकड, दिलीप गांधी, विजय चोरडिया, अनिल कोठारी, नगरसेवक अमर जैन, स्वरूपकुमार लुंकड, नंदलाल गादिया, शांतीलाल बिनायक्या, संध्या कांकरिया, सुनील जैन, श्रेयेस कुमट, नितीन चोपडा, अनिल शिसोदिया, संजय रेदासनी, नरेंद्र बंब, संदीप रेदासनी, सुनील श्रीश्रीमाळ, आदी समाजबांधव उपस्थित होते. ताराबाई डाकलिया, रसिला बरडिया, प्रकाश सिंघवी, दीपा कांकरिया, स्विटी देसर्डा यांच्यासह मान्यवरांनी आठवणींना उजाळा दिला.

READ ALSO

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

 

प्रत्येक प्रवचनातून माणुसकी, सदाचाराचा संदेश – अशोक जैन

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी आठवणींना उजाळा देताना म्हटले की, ‘वाणीभूषण पूज्यश्री प्रीतिसुधाजी म.सा. यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे करुणा, साधेपणा आणि आत्मोन्नतीचा अखंड प्रवाह होता. त्या केवळ जैन धर्माच्या मर्यादेत न राहता सर्व समाजासाठी प्रेरणास्थान बनल्या. त्यांच्या प्रत्येक प्रवचनातून माणुसकी, सदाचार आणि व्यसनमुक्त जीवनाचा सशक्त संदेश मिळत असे. त्यांच्या ओजस्वी वाणीने अनेकांचे जीवन बदलले, तर त्यांच्या रसाळ भजनांनी मनाला शांतता आणि दिशा दिली. ‘संस्कार भारती’ ही उपाधी त्यांच्या कार्याची खरी ओळख आहे, कारण त्यांनी असंख्य हृदयांत संस्कारांची ज्योत प्रज्वलित केली. जळगाव परिसरात त्यांनी केलेले आगमन हे अनेकांसाठी आयुष्यभराची प्रेरणा ठरले. आज त्या आपल्यात नसल्या तरी त्यांचे विचार, त्यांची शिकवण आणि त्यांनी दिलेली जीवनदृष्टी सदैव आपल्याला मार्गदर्शन करत राहील. त्यांच्या पवित्र स्मृतीस हृदयपूर्वक त्रिवार वंदन… त्यांचे कार्य आणि संस्कार हेच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.’

संत परंपरेतील तेजस्वी दीपस्तंभ – दलिचंदजी जैन

सकल जैन श्री संघाचे अध्यक्ष दलिचंदजी जैन यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की, ‘पूज्य प्रितीसुधाजी म.सा. यांचे व्यक्तिमत्त्व हे महाराष्ट्राच्या संत परंपरेतील तेजस्वी दीपस्तंभ होते. त्यांच्या विलक्षण बुद्धिमत्तेने, प्रभावी संवादशैलीने आणि मधुर कंठाने त्यांनी असंख्य हृदयांवर अधिराज्य गाजवले. त्यांनी दिलेली बंधुभाव, नैतिकता आणि सदाचाराची शिकवण आजही समाजाला दिशा देणारी आहे. सत्तरच्या दशकातील चार कंदील चौकातील त्यांचे ते अविस्मरणीय जाहीर प्रवचन आणि “ये रे ये रे भाऊराया… भाऊबीजेला…” हे भजन आजही हजारो भाविकांच्या स्मरणात जिवंत आहे, ते केवळ गाणे नव्हते, तर समाजाला एकत्र आणणारा स्नेहबंध होता. त्यांच्या पावन स्मृतीस माझे विनम्र अभिवादन. त्यांच्या शिकवणीचे आचरण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.’

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 सप्टेंबर 2026 !

September 17, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 04 मे 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर वारंवार अत्याचार ; चाळीसगाव पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

June 16, 2023

राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्राचे वर्चस्व अनुभूती स्कूलच्या विद्यार्थीनींची चमकदार कामगिरी

September 17, 2025

मोठी बातमी : जयंत पाटलांना अगोदर बोलण्याची संधी दिल्याने अजितदादांनी सोडले व्यासपीठ !

September 11, 2022

जिल्ह्यात आज आढळले अवघे २ कोरोनाबाधित !

September 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group