जळगाव (प्रतिनिधी) शहरातील मानराजपार्क जवळ आज धरणगावच्या वकीलाचा जळगावात अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
धरणगावसह जळगावात विधीक्षेत्रात कार्यरत असणारे अॅड.विवेक पाटील यांचा आज रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शहरातील मानराजपार्क जवळ भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अॅड.विवेक पाटील हे जळगावहून आपले कामकाज करून धरणगाव परत जात असताना मानराजपार्क जवळ समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना चिरडले. या अपघातात अॅड.विवेक पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अपघात झाल्यानंतर नगरसेवक अमर जैन आणि सागर पाटील यांनी घटनास्थळ गाठत जिल्हा रुग्णालयातून शववाहिका मागवली. तसेच वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली.
अपघातात मयत तरुण तब्बल तास भर महामार्गाव पडून असल्याचे विदारक चित्र आज पहावयास मिळाले. परिसरातील नगरसेवक अमर जैन अॅम्बुलन्स बोलावुन मृतदेह जिल्हारुग्णालयात हलविण्यात आला. मयत तरुणाचे नाव ॲड.विवेक पाटिल(वय-३५रा.धरणगाव)असे असल्याचे पेालिसांनी ओळख पटविल्यावर स्पष्ट झाले. धरणगाव येथील रहिवासी ॲड. विवेक प्रकाश पाटिल (वय-३५)जिल्हा न्यायालयात वकिली व्यवसाय करतात. जळगाव ते धरणगाव दुचाकीने अपडाऊन करुन त्याचे कामकाज सुरु असते. आज नेहमी प्रमाणे ते, जळगावी आले होते. कामाच्या व्यापामुळे आज उशिर होवुन रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ते, त्यांच्या दुचाकीने घराकडे(धरणगाव) येथे निघाले असतांना राष्ट्रीय महामार्गावर मानराज पार्क जवळ कार शोरुमच्या समोरच ॲड.पाटिल यांच्या दुचाकीला समोरुन सुसाट वेगात येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक देत चिरडून पसार झाला.
या अपघातात ॲड.विवेक पाटिल यांचा जागीच मृत्यु ओढवला. मयत ॲड.विवेक पाटिल यांच्या पश्चात सहामहिन्याची मुलगी, पत्नी आणि आई असा परिवार आहे. जळगाव शहरात १ किलोमिटरच्या परिघातच एका तरुणाचा अपघाती झाल्याची घटना रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास घडते. तरी, अपघातग्रस्त तरुण महामार्गावर तब्बल तासभर तसाच पडून असल्याचे विदारक चित्र आज पहावयास मिळाले. अपघातामुळे दोन्ही बाजुची वाहतूक पुर्णतःठप्प होवुन जवळपास दोन्ही बाजुने ३-४ किलोमिटर लांबचलाब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. परिसरातील रहिवासी माजी नगरसेवक अमर जैन यांना माहिती मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेत ॲम्बुलन्स सहीत पेालिसांना बोलावले.
अपघात एवढा भयानक होता की यात विवेक पाटील यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक हा घटनास्थळावरून पसार झाला. ज्या ठिकाणी अपघात झाला, त्याच ठिकाणी ॲड. वीरेंद्र पाटील हे सुद्धा वास्तव्यास आहेत. महामार्गावर अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर ॲड. वीरेंद्र पाटील यांनीही घटनास्थळ गाठले. वीरेंद्र पाटील यांनी मयताचे मोबाईल तसेच लायसन्स तपासले असता, मोबाईल तसेच लायसन्स वरून मयत ॲड वीरेंद्र पाटील यांचेच मित्र ॲड विवेक पाटील असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान या ठिकाणी पोलीस वेळेवर न पोहोचल्याने तब्बल तासभर मृतदेह हा रस्त्यावरच पडून होता. त्यामुळे महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. घटनेची माहिती स्थानिक नगरसेवक अमर जैन यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ संपर्क साधून घटनास्थळी रुग्णवाहिकेला पाचारण केले. त्यानंतर रुग्णवाहिकेतून मृतदेह हा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला.















