मुंबई (वृत्तसंस्था) भंपक, खोटारडे आणि बनावट लोक आहेत. शेठजींच्या पक्षाचे प्रवक्ते अन्वय नाईक आत्महत्याबाबत बोलत नाहीत. मराठी भगिनीच कुंकू पुसलं गेलं त्याबाबत बोलत नाहीत, आरोप खोटे आहेत. भंपक, खोटारडे आहेत. कोणत्या जमिनीचे व्यवहार ? कोण आहे हा माणूस, व्यवहार दाखवावेत, हा त्यांना इशारा आहे. मराठी माणसाने व्यवहार केलेला खूपत आहेत का ? कायद्याच्या चौकटीत राहून व्यवहार केलेला आहे. असा घणाघात संजय राऊत यांनी आरोप करणाऱ्यांवर केला आहे. शेठजीच्या पक्षाचे फालतू लोक तपासाची दिशा भरकवटण्यासाठी हा प्रयत्न सुरु आहे.
संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “अन्वय नाईक यांच्याशी २१ व्यवहार केल्याची थाप सोमय्या महोदयांनी मारली आहे. आम्ही म्हणतोय आता बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर. एका भगीनीचे कुंकू पुसल्याचे दु:ख या व्यापारी अवलादीस नाही. तक्रार जमिनीच्या व्यवहाराबाबत नसून भगिनीचे कुंकू पुसण्याबाबत आहे. किरीट सोमय्या यांनी जमिनीचे व्यवहार झाल्याचं सिद्ध करणारी कागदपत्रंही सादर केली आहेत. उद्धव ठाकरे यांनी अन्वय नाईक कुटुंबीयासोबत नेमके काय संबंध आहेत हे जाहीर करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. “२१ सातबारा उतारे आम्ही शोधून काढले आहेत. यामध्ये जमिनीचे व्यवहार झाले आहेत. असे किती व्यवहार उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक कुटंबाचे झाले आहेत? जमिनी घ्यायच्या आणि विकायच्या हा उद्धव ठाकरेंचा व्यवसाय आहे का? रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे की ही गुंतवणूक आहे याची माहिती आम्हाला हवी आहे,” अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. मी पण महाराष्ट्र्चाचा एक नागरिक आहे तर मला समजवून सांगणार का? रश्मी ठाकरे आणि मनिषा रविंद्र वायकर यांच्यातही काय संबंध आहे? एकत्र येण्यामागचं प्रयोजन काय हा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे.
ईडी काही तुमच्या बापाची आहे का, असेल तर तुम्हाला २५ वर्ष घरी बसवू. किरीर सोमया हा गिधाडसारखा पेपर घेऊन फडफडतोय. ही त्यांना वॉर्निंग आहे. तुम्ही कितीही काहीही करा पाच वर्ष हे सरकार चालणार आहे. कितीही फडफड करु द्या, त्यांनी काहीही निष्पन्न होणार नाही. रोज सकळी ते स्वतःची प्रतिमा आरश्यात पाहतात, आणि मग भ्रष्टाचार त्यांना वाटतो. बनावट लोक आहेत, व्यापारी आहे ढोंगी खोटे आरोप करत आहेत.