जळगाव (प्रतिनिधी) गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी इन्स्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अर्थात जीआयएमआरमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून बीसीए आणि बीबीए या अभ्यासक्रमांना मान्यता मिळाली असून याची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
गोदावरी फाऊंडेशन संचलीत गोदावरी इन्स्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अर्थात जीआयएमआरमध्ये व्यवस्थापनाशी संबंधीत विविध अभ्यासक्रम गत दोन दशकांपासून अतिशय यशस्वीपणे सुरू आहेत. येथे अतिशय दर्जेदार सुविधा उपलब्ध असून येथून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी जगभरात मोठ्या कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदांवर कार्यरत असून बर्याच विद्यार्थ्यांनी व्यवसायात देखील यश संपादन केले आहे. संस्थेला आयएसओ ९००१-२००८ मानांकन मिळाले असून नॅकने बी प्लस श्रेणीने गौरविले आहे. येथील अभ्यासक्रम हे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नीत असून याला केंद्र सरकारच्या एआयसीटीसीची मान्यता आहे. माजी खा.डॉ. उल्हास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक डॉ. प्रशांत वारके आणि त्यांच्या सहकार्यांनी जीआयएमआरला नावलौकीक मिळवून दिला असून अत्यंत प्रगतीशील संस्था म्हणून याची ओळख बनलेली आहे.
दरम्यान, यंदाच्या अर्थात २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून गोदावरी आयएमआरमध्ये बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (बीबीए) आणि बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लीकेशन (बीसीए) या दोन अभ्यासक्रमांना मान्यता मिळाली असून याची प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. यातील बीबीए अभ्यासक्रमासाठी बारावी, डी.एड, डिप्लोमा (पदविका) अथवा व्होकेशनल कोर्ससह बारावी उत्तीर्ण अशी अर्हता आहे. तर बीसीएससाठी विद्यार्थी बारावी, डिप्लोमा (पदविका) अथवा व्होकेशनल कोर्ससह बारावी उत्तीर्ण असावा. जीआयएमआरमध्ये उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध असून याला अनुभवी प्राध्यापक वृदांची जोड मिळालेली आहे. येथे अतिशय अद्ययावत अशी रिसर्च लॅब आहे. संस्थेत स्मार्ट क्लासरूम, सर्व संदर्भ ग्रथांनी युक्त असणारी लायब्ररी, विद्यार्थ्यांसाठी रिडींगडीं रूम, विविध कार्यक्रमांसाठी ऑडिटोरियम, भव्य मैदान आणि हॉस्टेल सुविधा आदी उपलब्ध आहेत. लक्षणीय बाब म्हणजे येथे तब्बल १२० वर्कस्टेशन्ससह इंटरनेटच्या गतीमान जोडणीने युक्त असणारी कँप्युटर लॅब उलब्ध असून येथे विद्यार्थ्यांना प्रॅक्टीकल दिले जाते. याच्या माध्यमातून जीआयएमआरमधील विद्यार्थ्यांसाठी एकविसाव्या शतकाशी सुसंगत अशी अध्ययन प्रणाली उभारण्यात आलेली आहे.
बीबीए आणि बीसीए अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रा. अश्वीनी :९१५६५४५८१४, प्रा. भाग्यश्री : ९१३०५६०१४५ अथवा संचालक डॉ. प्रशांत वारके :९३२५१५००६ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.