TheClearNews.Com
Sunday, June 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नाथाभाऊ नाबाद ७० ; हजारो शेतकऱ्यांना उद्धवस्त होण्यापासून वाचवणारा महानायक…!

The Clear News Desk by The Clear News Desk
September 2, 2022
in जळगाव, मुक्ताईनगर, राजकीय, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (सुरेश उज्जैनवाल) निवासी माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे आपल्या वयाची सत्तरी पूर्ण करून आज 71 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. जवळपास साडेतीन दशक अखंडीतपणे सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत या नेत्याचं जन्मदिनानिमित्त अभिष्टचिंतन आणि भावी वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा…!

प्रदीर्घ राजकीय वाटचालीत त्यांनी आपल्या कार्यशैलीच्या बळावर एखाद-दुसऱ्या कामाचा अपवाद वगळता लोकहिताची अनेक चांगली कामे त्यांनी यशस्वी करून दाखविली. सिंचन प्रकल्पांना चालना देण्यासाठी तापी विकास महामंडळाची स्थापना ही त्यापैकी एक माईल स्टोन ठरणारी म्हणता येईल. परंतु तापी महामंडळाने किती धरणे बांधली, किती हेक्टर शेत जमीन सिंचनाखाली आली, हा या लेखाचा मूळ विषय अजिबात नाही,.. तर मूळ विषय आहे, बंद पडलेल्या अथवा अवसायनात गेलेल्या खान्देश विभागातील सहकारी तत्वावरील सहकारी उपसा जलसिंचन संस्था.

READ ALSO

आमदार खडसेंनी लावून धरला जळगावच्या ७ बलून बंधाऱ्यांचा प्रश्न; नव्या अंदाजपत्रकाचे काम सुरू, जलसंपदा मंत्र्यांची माहिती

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

या दोन, चार नव्हे तर तब्बल 64 संस्था होत्या. या संस्थांनी उभारणीसाठी बँकांकडून घेतलेले सुमारे 150 कोटींचे कर्ज थकले होते, कर्ज थकल्यामुळे बँकांनी सभासद शेतकऱ्यांच्या शेतजमिनींवर बोजे बसवले. परिणामी संस्था तर अडचणीत आल्याच, पण त्याच बरोबर शेतकरीही आर्थिक संकटात ओढले गेले. खान्देशातील सुमारे 70 हजार शेतकरी आर्थिक दुष्टचक्रात अडकले. जमिनीवर बोजे (ई करार) बसवले गेल्याने त्यांची आर्थिक पतही संपुष्टात आली. तिकडे संस्था निर्माते सहकार क्षेत्रातील दिगग्जही हवालदिल झाले. कोरडवाहू क्षेत्रासाठी हक्काची सोय होईल, या चांगल्या हेतूने उपसा संस्था उभ्या केल्या, मात्र जलस्त्रोतांचा अभाव, तांत्रिक त्रुटी, भरमसाठ वीज बिल यासह अन्य कारणांनी योजनांना ब्रेक लागला, तो कायमचाच. तो काळ शिवसेना-भाजप युती शासनाचा आणि संस्था निर्माते बहुतांश कांग्रेस विचाराचे त्यामुळे परिस्थिती बिकट होती. त्यावेळी राज्याच्या मंत्रिमंडळत जलसंपदामंत्री म्हणून एकनाथराव खडसे विलक्षण जिद्दीने विभागाचा कारभार पुढे नेला. अनेक नव्या प्रकल्पांना चालना देत खान्देशमधील सिंचनाचा अनुशेष कसा भरून काढता येईल, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते. सहकारी उपसा जलसिंचन योजनांचा विषय स्थानिक काही नेत्यांनी त्यांच्याकडे मांडला व प्रश्न कसा सोडवता येईल, या बाबत आग्रह केला.

1998 च्या सर्व साधारण सभेत केली घोषणा…!

जळगाव जिल्हा बँकेच्या सभागृहात सहकार क्षेत्रातील प्रमुख नेत्यांची सर्वसाधारण सभा झाली. या सभेत माजीमंत्री जे. टी. दादा महाजन, सुरेशदादा जैन, ओंकारअप्पा वाघ, वसंतराव मोरे काका, चिमणराव आबा पाटील, ज्येष्ठ सहकार नेते प्रल्हादराव पाटील यांच्यासह ज्येष्ठ नेते मंडळी उपस्थित होती. या सभेत सर्व नेत्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर श्री खडसेंनी सहकारी उपसा योजना सरकार अर्थात तापी पाटबंधारे महामंडळ ताब्यात घेऊन संस्थांकडील कर्जही भरण्याची घोषणा केली. घोषणा केल्यानंतर कायदेशीर अडचणीची पूर्तता करण्यासह आपली राजकीय इच्छाशक्ती पणाला लावली. तापी विकास महामंडळाच्या मूळ अधिनियमात कलम 18 (म) चा वापर करून दिलेला शब्द 24 मे 2005 रोजी पूर्ण करून दाखविला, विशेष म्हणजे त्या वेळी ते विरोधी पक्ष म्हणून लढा देत होते. त्या वेळी राज्यात आघाडीचे सरकार होते. वास्तविक सहकारी उपसा योजनांशी त्यांचा काहीही संबध नव्हता, तरीपण पक्षीय राजकारण बाजूला ठेवत त्यांनी दाखविलेली उदात्तता राजकारणातील दुर्लभ उदाहरण म्हणता येईल. संस्थाचालक वेगळ्या पक्ष्याचे होते, तरी त्यांनी शेतकरीहित सर्वोच्च मानून प्रश्न धसास लावला. सरकारने कर्जाची संपूर्ण रकम फेडत शेतकऱ्याच्या सात-बारा वरील बोजा ची नोंद ही दूर केली. एका प्रकारे त्यांनी आर्थिकदृष्टया उध्वस्त होऊ पाहाणाऱ्या हजारो शेतकऱ्यांना वाचविले.

53 हजार हेक्टर सिंचन क्षमतेच्या संस्था..

श्री खडसेंच्या अथक प्रयत्नांमुळे आज या 64 योजना तापी महामंडळाच्या ताब्यात गेल्या आणि सभासद शेतकरी कर्जमुक्त झाले. जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील 53 हजार 400 हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या या संस्थावरील कर्ज पूर्णपणे शासनाने जेडीसीसी, धुळे जिल्हा बँक, महाराष्ट्र कृषी ग्रामीण बँक, बँक ऑफ इंडिया, एसबीआय, देना बँक आदी सर्व वित्तीय संस्थांची देणी चुकती केली आहेत. श्री खडसे यांची शेतकऱ्यांप्रति असलेली बांधिलकी आणि दुर्दम्य राजकीय इच्छाशक्तीचा हा परिपाक आहे. विकासकामांच्या अथवा नाविन्यपूर्ण योजनेच्या श्रेयासाठी किती टोकाचा संघर्ष अलीकडे राजकीय क्षेत्रात अनुभवास येतो. परंतू खान्देशातील सहकारी उपसा योजनांचा प्रश्न सोडविल्याचे श्रेय श्री.खडसे यांनी घेतल्याचे कधी ऐकिवात नाही…!

 

“हजारो साल नर्गिस अपनी, बे नुरी पर रोती है
बडी मुश्किल से पैदा होता है चमन मे दिदवर पैदा…!”

सुरेश उज्जैनवाल (मो. 8888889014)
ज्येष्ठ पत्रकार, जळगाव

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

आमदार खडसेंनी लावून धरला जळगावच्या ७ बलून बंधाऱ्यांचा प्रश्न; नव्या अंदाजपत्रकाचे काम सुरू, जलसंपदा मंत्र्यांची माहिती

June 12, 2026
कृषी

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

June 11, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 7, 2026
जळगाव

खा. श्रीकांत शिंदे व खा. मिलिंद देवरा यांची जैन हिल्सला भेट

June 6, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण, लिंगायत धर्मगुरु डॉ. शिवमूर्ती यांना मध्यरात्री अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विहिरी व घरकुलांच्या मंजुरीसाठी लाभार्थ्यांकडून पैसे लुबाडणाऱ्यांना सोडणार नाही !

April 28, 2025

धरणगाव रस्ता कुठं आहे?, विचारात वृद्ध महिलेच्या गळ्यातील पोत केली लंपास !

August 25, 2023

जैन भूमिपुत्र ‘रामलल्ला’ विशेषांकाचे हनुमान जयंती दिनी प्रकाशन !

April 23, 2024

३४ जिल्ह्यात ग्रामपंचायतीसाठी १५ जानेवारी पासून मतदानास सुरुवात

December 11, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group