भुसावळ (प्रतिनिधी) वैद्यकीय चाचणी करून पोलिस ठाण्यात नेताना २८ वर्षीय आरोपीने भुसावळ तालुका पोलिसांच्या वाहनातून पळ काढला. यानंतर पोलिसांनी त्याचा सिनेस्टाइल पाठलाग सुरू केला. यावेळी आरोपीने सुमारे ५० फूट उंच पुलावरून उडी घेतली. पण पाय व मानेला मार लागल्याने तो जखमी झाला. यानंतर पोलिसांनी त्याला पकडले. मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास सुभाष गॅरेजजवळील रेल्वे पुलाजवळ हा थरार रंगला.
तालुक्यातील साकेगाव येथील अल्पवयीन मुलीस १६ एप्रिलच्या मध्यरात्री फूस लावून पळवल्याप्रकरणी पंकज धनराज ठाकूर (वय २८, रा. साकेगाव ता. भुसावळ) याच्यावर तालुका पोलिसांत गुन्हा दाखल आहे. या दोघांना पोलिसांनी नाशिक येथून ताब्यात घेतले. नंतर अल्पवयीन मुलीची जळगावात वैद्यकीय तपासणी झाली. तर मंगळवारी सकाळी ठाकूर याला वैद्यकीय तपासणीसाठी भुसावळ ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते.
चाचणी झाल्यावर पुन्हा पोलिस ठाण्यात जाताना त्याने पोलिसांच्या वाहनातून पलायन केले. यामुळे पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. यादरम्यान त्याने सुभाष गॅरेज जवळील रेल्वे पुलाजवळ सुमारे ५० फूट उंच पोलिस वाहनातून पुलावरून खाली उडी मारली. पुलावरून खाली उडी मारली. पण, या प्रयत्नात तो जखमी झाला. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन ट्रामा हलवले. तेथून त्याला सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, या प्रकरणी भुसावळ शहर पोलिसात पंकज ठाकूर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना.संदेश निकम हे करीत आहेत.