भुसावळ प्रतिनिधी । घरगुती वापरासाठी आसलेला गॅसचा काळाबाजार करणाऱ्या एकावर भुसावळ तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाने कारवाई करत मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई सोमवारी ८ जुलै रोजी दुपारी १.३० वाजता भुसावळ शहरातील एसबीआय बँक परिसरात असलेल्या पत्राच्या शेडमध्ये करण्यात आली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, भुसावळ शहरातील एसबीआय बँक परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये घरगुती गॅसचा काळा बाजार चारचाकी वाहन व रिक्षांमध्ये भरत असल्याची गोपनिय माहिती भुसावळचे पुरवठा निरीक्षकांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकासह पत्र्याच्या शेडवर सोमवारी ८ जुलै रोजी दुपारी १.३० वाजता छापा टाकला. याठिकाणी संशयित आरोपी शाहरुख कादर खाटीक रा. आयान कॉलनी भुसावळ हा घरगुती गॅस हा चारचाकी वाहन व रिक्षामध्ये भरतांना आढळून आला. त्यानुसार कारवाई करत पथकाने गॅस सिलेंडर, गॅस भरण्याचे सस्पेन्शन मशीन, इलेक्ट्रिक काटा असा पोलीसांच्या मदतीने जप्त केला आहे. याप्रकरणी पुरवठा निरीक्षक अतुल वाकोजी नागरजोगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाहरुख कादर खाटीक रा. आयान कॉलनी भुसावळ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ तेजस परिसरकर हे करीत आहे.