भुसावळ (वृत्तसंस्था) भुसावळ शहरातील रस्त्यावर अतिक्रमण करणारे व शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या जामनेर रोड, कृष्णा नगर, वांजोळा रोड, नहाटा चौफुली, खडका रोड, आयन कॉलनी, ग्रीन पार्क भागातील व्यापारी आपले दुकाने शासनाने ठरवून दिलेल्या अतिरिक्त वेळेत सुरू ठेवून व्यवसाय करीत असल्याने पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांचे आदेशान्वये बाजारपेठ पोलीस स्टेशनला या व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
आधीक माहिती अशी की,प्रशांत नथ्यू पाटील यांचा जामनेर रोडवर(चायनीज) व्यवसाय असून सोमवारी रात्री १२.५ ला शॉप सुरू होते.गणेश अशोक कोळी साई डेअरी मागे कृष्णा नगर यांचे चायनीजचे दुकान ११.१० वाजेपर्यत सुरू होते संग्राम उत्तम पाटील दत्त नगर वंजोळा रोड राजपूत चाट भंडार हे ११.०२ वाजेपर्यत सुरू होते. शुभम गोकुळ ठाकूर जामनेर रोड यांची पान टपरी ही ११.१५ वाजेपर्यत सुरू होती. भारती रविंद्र शिंदे यांचे नहाटा चौफुली वर बिर्याणी शॉप ११.२७ वाजेपर्यत सुरू होते.राजेंद्र शामराव इंगळे यांचे नहाटा चौफुली वर बिर्याणी शॉप ११.२९ वाजेपर्यत सुरू होते. नानक परशुराम पारेचाणी यांची हॉटेल वैष्णवी ही ११.२९ वाजेपर्यत सुरू होती. अकलक मोहम्मद पिंजारी याचे चायनीज शॉप खडका रोड वर ११.३२ वाजेपर्यत सुरू होते. इरफान शेख रशीद आयान कॉलनी यांची ईबाद दूध डेअरी ही ११.२५ वाजेपर्यत सुरू होती. इस्माईल अब्दुल रज्जाक तेली यांची ग्रीन पार्क मध्ये एच.एम.टी. डेअरी ही ११.३० वाजेपर्यत सूर असल्याचे मुंबई पोलीस अधिनियम १९५१ कलम ३३ (१), ३३(W) ,१३१,५ प्रमाणे मा.पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या आदेशानुसार बाजारपेठ पोलीस स्टेशनचे सपोनि अनिल मोरे,सपोनि मंगेश गोंटला,पोहेकॉ जयराम खोडपे,पोना उमाकांत पाटील,पोना समाधान पाटील, दीपक पाटील तसेच गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी अशांनी मिळून कारवाई केली.
















