जळगाव (प्रतिनिधी) शहरापासून जवळच असलेल्या बांभोरी पुलाला समांतर रस्ते व बंधारा बांधण्यासाठी कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे.
अजिंठा विश्रामगृह झाली बैठक !
आज रविवारी १९ नोव्हेंबर रोजी अजिंठा विश्रामगृह येथे बैठक घेण्यात आली. यावेळी कृती समितीची स्थापना करण्यात आली. बांभोरी पुलाचे समांतर रस्ते सह बंधारा बांधण्याची प्रशासकीय मान्यता असताना सुद्धा फक्त पुलाचे बांधकामाचे टेंडर निघाल्याने त्यावर आवश्यक तो निधी वाढवून बंधारासह पुलाचे बांधकाम व्हावे, या साठी हि कृती समिती आवश्यक तो पाठपुरावा करणार आहे. पूर्वीची समांतर रस्ते कृती समिती हीच बांभोरी पुल – बंधारा कृती समिती म्हणून कार्यरत आहे.
सोमवारी देणार निवेदन !
सार्वजनीक बांधकाम अधीक्षक अभियंता यांना सोमवारी २० नोव्हेंबर सोमवारी सकाळी ११ वाजता निवेदन देण्यात येणार आहे. अशी माहिती कृती समितीच्या वतीने देण्यात आले आहे. यावेळी सरिता माळी – कोल्हे, डॉ राधेश्याम चौधरी,विष्णू भंगाळे,सुनील महाजन, अॅड. जमील देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी, विनोद देशमुख, अॅड. झालटे, शिवराम पाटील, बंटी जोशी, आशुतोष पाटील, फारुक शेख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.