मुंबई (वृत्तसंस्था) ड्रग्जप्रकरणाच्या चौकशीसाठी अभिनेत्री दीपिका पदुकोण एनसीबी कार्यालयात पोहोचली असून तिच्या चौकशीला सुरुवात झाली आहे. एनसीबीतील मराठमोळे अधिकारी समीर वानखेडे हे दीपिकाची चौकशी करत आहेत.
ड्रग्जप्रकरणात नाव आल्यानंतर एनसीबीने दीपिका पदुकोणला समन्स पाठवत आज सकाळी १० वाजता एनसीबीच्या गेस्ट हाऊसमध्ये चौकशीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार दीपिका १५ मिनिटं आधीच एनसीबी कार्यालयात पोहोचली. सर्वांना चकवा देत तोंडाला मास्क लावून दीपिका एनसीबीच्या कार्यालयात पोहोचली. दीपिकाच्या चौकशीसाठी ३५ प्रश्नांची यादी तयार करण्यात आली आहे. दुसरीकडे अभिनेत्री सारा अली खान आणि श्रद्धा कपूरचीही समीर वानखेडे हेच चौकशी करणार आहेत. सारा आणि श्रद्धा देखील काही वेळातच एनसीबी कार्यालयात पोहोचणार असल्याचे कळते.