TheClearNews.Com
Thursday, September 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांसाठी सर्वसाधारण कार्यपद्धती निश्चित करण्याला डॉ. नितीन राऊतांची मंजुरी

The Clear News Desk by The Clear News Desk
September 2, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांसाठी सर्वसाधारण कार्यपद्धती निश्चित करण्याला आज ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मंजुरी दिली. राज्यात अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प राबवू इच्छिणाऱ्या कंपन्यांना ऑनलाईन वेब पोर्टलच्या माध्यमातून अर्ज करण्याची आणि त्यांच्या अर्जावर कालबद्ध प्रक्रिया करण्याची यंत्रणा तात्काळ उभारण्याचे निर्देशही डॉ. राऊत यांनी दिले आहेत.

अपारंपरिक ऊर्जा धोरणाच्या अंमलबजावणीसाठी महाऊर्जाला (मेडा) नोडल एजन्सी नियुक्त करण्यात आले आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यात अपारंपरिक ऊर्जेच्या प्रसारावर भर देण्याचे ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी ठरविले आहे. या धोरणाची वेगवान अंमलबजावणी व्हावी आणि या क्षेत्रात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या कंपन्यांना जमीन व आवश्यक इतर मान्यता लवकरात लवकर मिळाव्यात यासाठी एक कार्यपद्धती तयार करण्यात आली आहे. या कार्यपद्धतीला आज ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुकाणू समितीच्या बैठकीत मान्यता दिली.

READ ALSO

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

सन 2025 पर्यंत राज्यात 17385 मेगावॅट क्षमतेचे अपारंपरिक वीज निर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्याचे लक्ष्य राज्य सरकारने निश्चित केले असून त्यासाठी दरवर्षी किती प्रकल्प उभारणार? किती लक्ष्य साध्य करणार? याबद्दल नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या धोरणाची मिशन मोडवर वेगवान अंमलबजावणी करा,असे निर्देशही त्यांनी दिले.

या संदर्भात आज वीज कंपनीच्या मुंबई येथील एचएसबीसी बिल्डिंग कार्यालयात डॉ.राऊत यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महानिर्मिती कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, महाऊर्जाचे महासंचालक सुभाष डुंबरे, महावितरणचे संचालक (प्रकल्प) भालचंद्र खंडाईत, संचालक ( वाणिज्य) सतीश चव्हाण, मराविमं सूत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे व इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

राज्यात विजेची वाढती मागणी विचारात घेता पुढील पाच वर्षात 17 हजार 385 मेगावॅट इतकी अपारंपरिक ऊर्जा निर्मिती करण्यासाठी प्रकल्प स्थापित करण्याचे उद्दिष्ट अपारंपरिक ऊर्जा धोरण 2020 मध्ये ठरविण्यात आले आहे. यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक होऊन यामुळे रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. तसेच कृषीपंपांना दिवसा 8 तास वीज पुरवठा उपलब्ध होणार आहे. अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांसाठी सर्वसाधारण कार्यपद्धती निश्चित करण्यात आल्याने विकासक व प्रकल्पधारक यांना प्रकल्प आस्थापित करण्याचा मार्ग सुलभ होऊन प्रकल्प उभारणीचे काम जलद गतीने उभारण्यास मदत होणार आहे. ही कार्यपद्धती तयार करण्यासाठी ऊर्जा विभागाने सर्व संबंधित घटकांसोबत चर्चा करण्यात आली आहे.

या धोरणाची अंमलबजावणी करताना राज्यातील गुंतवणूकदार संस्था वा कंपन्या यांना प्राधान्य द्या, ऑनलाईन डॉक्युमेंट मॅनेजमेंट प्रभावीपणे करा, असेही निर्देश त्यांनी दिले. अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प उभारणाऱ्या उद्योजकाना उत्पन्नाची खात्री मिळावी म्हणून त्यांना दरांची हमी देण्यासाठी महावितरणतर्फे राज्य ऊर्जा नियामक आयोगाकडे विनंती केली जाणार आहे. अपारंपारिक ऊर्जा निर्मिती प्रकल्पांतून स्वस्त विजेची निर्मिती होत असल्याने नजीकच्या काळात राज्यात विजेचे दर कमी होणार असून यामुळे उद्योगवाढीस चालना मिळणार आहे. तसेच क्रॉस सबसिडीचा भार कमी झाल्याने औद्योगिक विजेचे दर कमी होतील, असा विश्वास डॉ.राऊत यांनी व्यक्त केला.

 

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
जळगाव

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

September 16, 2026
Next Post

जिल्ह्यात लसीकरणाचा उच्चांक : एकाच दिवशी 77 हजार 513 लाभार्थ्यांचे लसीकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव पोलीस निरीक्षकांची अनोखी गांधीगिरी: विना हेल्मेट वाहनचालकांना गुलाबाचे फुल

January 22, 2025

अनोरे येथे समस्त ग्रामस्थतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

May 4, 2021

कन्नड घाटाखाली चाकूचा धाक दाखवून १६ हजारांचा ऐवज लुटला

November 30, 2025

घरात १२ लोकं असताना मिळालं अवघ १ मत ; उमेदवार ढसाढसा रडला !

December 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group