मुंबई प्रतिनिधी । महाराष्ट्र सरकार आणि कंगना रणौत यांच्यातील शाब्दिक युद्ध अजूनही कमी झालेलं नाही. बीएमसीने कंगनाच्या मुंबई स्थित ऑफिसवर कारवाई केल्यानंतर आता कंगना महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेऊ शकते. कंगना संध्याकाळी ४ च्या सुमारास राज्यपालांची भेट घेऊ शकते.
सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून मुंबई पोलीस आणि ठाकरे सरकारवर केलेली जहरी टीका आणि मुंबईची पीओकेशी तुलना केल्याने बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत वादात सापडली असून, मुंबई महानगरपालिकेने काही दिवसांपूर्वी तिच्या कार्यालयातील अनधिकृत बंधकामावर कारवाई केली होती. त्या पार्श्वभूमीवर कंगना राणौत आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहे. या भेटीमध्ये कंगना आपल्या कार्यालयावर करण्यात आलेल्या कारवाईबाबत राज्यपालांकडे तक्रार करण्याची शक्यता आङे.
शिवसेना-कंगना वाद जोर धरत असतानाच रामदास आठवले कंगनाच्या भेटीला तिच्या घरी गेले होते. मुंबईतील ऑफिस तोडल्याप्रकरणी आणि मुंबईत सुरक्षा दिल्यानंतर आठवलेंनी तिच्याशी चर्चा केली. त्यानंतर, आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत कंगनावर अन्याय झाल्याची खंत व्यक्त केली. गुरुवारी कंगना आणि रामदास आठवले यांच्या तब्बल 1 तास चर्चा झाली. त्यामध्ये सुशांतसिंह राजपूत प्रकरणापासून ते मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईसंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली. यावेळी, रामदास आठवेंली घरी येऊन भेट घेतल्याबद्दल तिने आभार मानले. तसेच, आपण माझ्या घरी आलात हे माझे सौभाग्य आहे, आपले आशीर्वाद मला हवेत. आपण आमच्या हिमाचलमधील घरी यावे, आपला पाहुणचार करायची संध्या द्यावी, असे कंगनाने म्हटले. तसेच, डॉ. बाबासाहेबांच्या संविधानाचा मला अभिमान असल्याचेही कंगना म्हणाली. तर, रिपाइं तुमच्या पाठिशी असल्याचे आठवलेंनी आश्वस्त केलं.