औरंगाबाद (वृत्तसंस्था) संपूर्ण राज्यात आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या पाटोदा या गावात भास्करराव पेरे पाटील यांच्या पूर्ण पॅनलचा पराभव झाला आहे. भास्करराव पेरे यांनी त्यांचा संपूर्ण हयातीत पोटोदा या गावाच्या विकासासाठी प्रयत्न केले. मात्र यंदाच्या निवडणुकीत पेरे यांना पराभवाचा सामाना करावा लागला आहे. त्यांच्या पूर्ण पॅनलसोबतच त्यांची मुलगी अनुराधा पेरे यांचाही पराभव झाला आहे. मात्र, येथे भास्करराव पेरे यांचं संपूर्ण पॅनलच पराभूत झाले आहे.
पाटोदा ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा आज निकाल लागला. यामध्ये भास्करराव पेरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाटोद्यात पॅनल उभे केले. भास्करराव पेरे पाटील यांच्या कन्या अनुराधा पेरे पाटील या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. अनुराधा पाटील यांना १८६ मतं मिळाली आहे तर, त्यांच्या विरोधात उभे असलेले दुर्गेश खोकड यांनी २०४ मतं मिळवून विजय मिळवला आहे. भास्करराव पाटील यांच्या पॅनलचा पराभव हा धक्कादायक मानला जात आहे. भास्करराव पेरे पाटील हे गेली २५ वर्ष पाटोदा ग्रामपंचायतीत सरपंच म्हणून कार्यरत आहे. या काळात पाटोदा गावाचा कायापालट करुन राज्यात आदर्श गाव म्हणून ओळख मिळवून दिली होती. मात्र, यंदा त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यांच्या कन्या अनुराधा या निवडणुकीत उतरल्या होत्या. मात्र, येथे भास्करराव पेरे यांचं संपूर्ण पॅनलच पराभूत झाले आहे. पाटोदा गावातील ११ जागांपैकी ८ उमेदवार बिनविरोध निवडणून आले होते. तर, बाकीच्या तीन जागांसाठी निवडणूक झाली होती. मात्र, या तिन्ही जागांवर भास्कर पेरे यांच्या पॅनलचा पराभव झाला असून संपूर्ण ११ जागांवर कपिंद्र पेरे पाटील यांच्या पॅनलनं सत्ता मिळवली आहे.
मागील कित्येक वर्षांपासून भास्करराव पेरे यांनी पाटोदा ग्रामपंचायतीवर सत्ता गाजवलेली आहे. या काळात त्यांनी पोटादा गावाचा विकास करून गावाची किर्ती समस्त राज्यात पसरवली होती. त्यासाठी त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं. मात्र, यावेळच्या निवडणुकीत पेरे यांना पराभवाचा समाना करावा लागला. भास्कर पेरे ३० वर्षांनंतर गावाच्या राजकारणातून बाद झाले आहेत.
















