जळगाव (प्रतिनिधी) एआयएमआयएम लोकसभा अध्यक्ष ॲडव्होकेट इम्रान हुसेन यांच्या वाढदिवसानिमित्त शाहूनगरातील गरीब मुलांना नोटबुक वाटप करण्यात आले.
अॅडव्होकेट इम्रान हुसेन AIMIM जळगाव लोकसभा अध्यक्ष यांनी आपला वाढदिवस स्नेही पद्धतीने साजरा करताना कोणतेही बॅनर लावले नाही. तसेच केक कापताना ५० गरीब मुलांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय वह्या देण्यात आल्या. यावेळी जळगाव AIMIM चे सर्व जबाबदार पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उत्तर महाराष्ट्र सदस्य रायन जहागीरदार, उत्तर महाराष्ट्र विश्लेषक जळगाव महानगर अध्यक्ष सय्यद दानिश अहमद, जळगाव लोकसभा उपसभापती आसिफ शेख, लोकसभा सचिव ओवेस खान, महानगर उपाध्यक्ष इम्रान शेख, गनी मीडिया प्रभारी उसामा शेख, सचिव नूर मोहम्मद, बॉडी सदस्य परवेज शेख व उमर शेख फैजान खाटीक, शोएब मिर्झा शकील मलिक व दिग्गज कार्यकर्ते उपस्थित होते.