जळगाव प्रतिनिधी । केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालय एम.जे.कॉलेज मध्ये गणेशोत्सवाचे औचित्य साधून विविध शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धा शिक्षकदिनाच्या दिवशी शिक्षकदिन साजरा करून संपन्न करण्यात आली व घेतलेल्या विविध स्पर्धांचे बक्षिसे जाहीर करण्यात आले.
गणेशोत्सवात समाविष्ट करण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये देशभक्तीपर गीत गायन, गणपती स्तोत्र पठण, बुके तयार करणे, हार तयार करणे, गणपती अथर्वशीर्ष, गणपती कथा, गणपती मूर्ती तयार करणे, शिक्षक दिन वक्तृत्व स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले व त्यांची बक्षिसे जाहीर करण्यात आली. त्यात इयत्ता २री गणपती स्तोत्र पठण स्पर्धेत प्रथम पूजा समाधान सुतार, द्वितीय शाश्वत विशाल कुलकर्णी , तृतीय स्वामी अजय बोरसे , इयत्ता ४ थी बुके तयार करणे प्रथम रुद्र ज्ञानेश्वर पाटील, द्वितीय प्रियंका सुनील सोनवणे , तृतीय संस्कृती संदीप जोशी , देशभक्तीपर गीत प्रथम प्राची जितेंद्र कोतवाल, द्वितीय तेजस किशोर पाटील, तृतीय संस्कृती संदीप जोशी, उत्तेजनार्थ संस्कृती महेंद्र गायकवाड यांची निवड करण्यात आली.
सदर स्पर्धा सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मुख्याध्यापिका रेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडल्या.प्रसंगी शालेय शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी, पर्यवेक्षिका प्रणिता झांबरे आदी उपस्थित होते.