ठाणे (वृत्तसंस्था) कल्याणच्या पत्री पुलाचे गर्डर लाँचिंग म्हणजे चांद्रयान मोहीम नाही. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी इतर पुलांच्या कामांमध्ये लक्ष घालावं, अशी खोचक टीका मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.
“आदित्य ठाकरे हे गर्डर लाँचिंगसाठी कल्याणला आले होते. त्यांनी केवळ पत्री पूल कामाची पाहणी न करता ठाकूर्ली ते माणकोली खाडी पूल, कोपर पूल, पलावा पूल, आंबिवली येथील रेल्वे उड्डाण पूल यांचीही कामं मार्गी लावावीत. असे राजू पाटील म्हणाले होते.
कल्याणच्या पत्री पुलाचे गर्डर लाँचिंग म्हणजे चांद्रयान मोहीम नाही. त्यांनी इतर पुलांच्या कामांमध्ये लक्ष घालावं अशी टीका मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. कल्याणमधील पत्री पुलाच्या गर्डर लाँचिंगला आदित्य ठाकरेंची उपस्थिती होती. त्यावर आता मनसेचे आमदार राजू पाटील यांनी टीका केली आहे. डोंबिवली हे आदित्य ठाकरे यांचे आजोळ आहे. त्यांनी इतर रखडलेल्या कामांमध्येही लक्ष घालावं असंही राजू पाटील यांनी म्हटलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून कल्याणच्या पत्री पुलाचा प्रश्न प्रलंबित आहे. आज या पत्री पुलाचे गर्डर लाँचिंग करण्यात आले. यावेळी त्या ठिकाणी आदित्य ठाकरे यांची उपस्थिती होती. मात्र आदित्य ठाकरेंच्या या उपस्थितीवर मनसेने टीका केली आहे.
पत्री पुलाला जोडणाऱ्या ९० फुटाच्या रस्त्याचा प्रश्नही अद्याप प्रलंबित आहे. कल्याणमधील पत्री पुलाच्या गर्डर लाँचिंगचं काम आज सुरु झालं आता पुढचे दोन दिवस हे काम चालणार आहे. या लाँचिंगच्या वेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह शिवसेना नगरसेवक, पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीवर मनसेने टीका केली आहे.