मुंबई (वृत्तसंस्था) गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल ८३,३४७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १,०८५ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज (२३ सप्टेंबर) दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ८३,३४७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ५,६४६,०११ वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा ९०,०२० पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी ९,६८,३७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ४५,८७,६१४ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 56 लाखांचा टप्पा पार केला आहे. रुग्णसंख्येने नवा उच्चांक गाठला असून हादरणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर आली आहे.